Kranti Redkar Instagram
मनोरंजन

Kranti Redkar Video: क्रांतीच्या आईला तोड नाही.. व्हिडिओ पाहून बघा, तुमचीही आई असंच करते का?

क्रांती रेडकर सोशल मीडियावर तिच्या डे टू डे लाईफमधील अनेक किस्से व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असते.

प्रणाली मोरे

Kranti Redkar Video: मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर सोशल मीडियावर भलतीच सक्रिय पहायला मिळते. ती अनेकदा व्हिडीओ रील म्हणा किंवा कुटुंबियांचे काही मजेदार किस्से व्हिडीओच्या माध्यमातून शेअर करत असते.

यात ती अनेकदा आपल्या आईचे काही किस्से शेअर करत असते. नुकताच तिनं एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात ती आपल्या आईला कधीच फोन करत नाही असं म्हणत यामागची रामकहाणी देखील सांगितली.

खरंतर ती खूपच मजेदार गोष्ट आहे..जी ऐकल्यावर प्रत्येकालाच हसू येईल खासकरून लग्न झालेल्या मुलींना आपली देखील आई अशीच करते...असं वाटूनही जाईल. चला नेमकं आईला क्रांती फोन का करत नाही हे जाणून घेऊया.

क्रांतीनं नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात ती म्हणाली आहे की ती तिच्या आईला फोन करत नाही अशी आईची तिच्या तक्रार आहे. पण याचं कारण सांगत क्राती म्हणालीय आई तशी संधीच तिला देत नाही.

ती पुढे म्हणाली आहे,तिची आई तिला दर अर्ध्या तासाने फोन करते आणि तिच्या प्रत्येक गोष्टीची माहिती करून घेते. आता दर अर्ध्या तासाने आई फोन करत असल्यानं मी कधी फोन करायचा हाच मोठा प्रश्न आहे. आणि हे सकाळी ८ पासून रात्री १२ पर्यंत सुरू असतं असं देखील क्रांती म्हणाली आहे.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्रांतीनं ज्या पद्धतीनं हे सगळं विस्तारीतपणे सांगितलं आहे ते खरंच ऐकताना खूप मजेदार वाटत आहे. म्हणजे दर अर्ध्या तासाला आई फोन करुन काय विचारते याचा संपूर्ण वृत्तांत तिनं दिला आहे.

क्रांती अनेकदा वेगवेगळ्या विषयांवर आपले विचार मांडत असते. क्रांतीनं दिग्दर्शित केलेल्या 'रेन्बो' चित्रपटामुळे सध्या ती भलतीच चर्चेत आहे. उर्मिला कानेटकर,सोनाली कुलकर्णी,शरद केळकर,रिषी सक्सेना अशा कलाकारांनी 'रेन्बो' सिनेमात काम केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

SCROLL FOR NEXT