Kriti Kharbanda poses boyfriend at the beach 
मनोरंजन

बीचवरचा रोमॅंटिक फोटो शेअर करत क्रितीने दिली प्रेमाची जाहीर कबुली

वृत्तसंस्था

मुंबई : बॉलिवूड हे क्षेत्रच इतकं हॅपनिंग आहे. त्यामुळे सतत काहीतरी होत असतं. कधी कॉन्ट्रॉवर्सी, वॉर, भांडणे तर कधी ब्रेकअप आणि लव्हस्टोरी असं काहीतरी घडत असतं आणि चर्चेचा विषय ठरतो. अभिनेत्री खारबंदा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. 'हाऊसफुल 4' मध्ये ती झळकली आणि सध्या एका खास कारणामुळे ती पुन्हा एकदा लाइमलाइटमध्ये आली आहे. क्रिती खारबंदाने तिच्या प्रेमाची कबुली दिली आहे ! 

अभिनेत्री खारबंदाने आजवर मोजकेच सिनेमे केले आहेत आणि तरीही बी-टाऊनमध्ये तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकतचं क्रितीने तिच्या प्रेमाची कबुली सोशल मीडियावर दिली आहे. इन्स्टाग्रामवर बॉयफ्रेंडसोबत फोटो टाकून प्रेमाचा इजहार करत चर्चांना पूर्णविराम दिला आहे. 

दुसरं तिसरं कोणी नसून क्रितीने अभिनेता पुलकित सम्राटसोबत एक क्युट फोटो शे्अर केला आहे. ते दोघं डेट करत असल्याचं अधिकृतपणे तिने या पोस्टद्वारा कबुल केलं आहे. शेअर केलेल्या फोटोला कॅप्शन देताना क्रितीने फक्त हार्टची इमोजी दिली आहे. या फोटोमध्ये आणि पुलकित बिचवर ट्रॅडिशनल कपड्यांमध्ये दिसत आहेत. बीचवरील मावळत्या सुर्यासोबतचा हा फोटो खूप रोमॅंटिक आहे आणि चाहत्यांनी या फोटोवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

पुलकित आणि क्रिती यांनी 'पागलपंती' या चित्रपटातून एकत्र काम केलं. या चित्रपटाच्या शुटींगदरम्यान त्या दोघांची मैत्री झाली. त्याच मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं असून त्याची कबुली दोघांनी दिली आहे.

सलमान खानची मानलेली बहिण श्वेता रोहिरा हिच्याशी 201 मध्ये पुलकितचं लग्न झालं होतं. पण काहीच वर्षांत ते वेगळे झाले. या प्रकारामुळे सलमान पुलकितवर नाराज होता. एवढचं काय त्यानंतर पुलकितला मोठ्या बॅनरचे चित्रपट मिळणंही अवघड झालं होतं. मध्यंतरी पुलकितचं नाव अभिनेत्री यामी गौतम हिच्याशी जोडलं गेलं होतं.     

पुलकितने सनम रे, फुकरे, विरे की वेडिंग, डॉली कि डोली, बंगीस्तान या चित्रपटातून काम केलं आहे. तर, क्रितीने हाउसफुल, पागलपंती, गेस्ट इन लंडन, विरे कि वेडिंग असे हिंदी सिनेमे केले तर अनेक दाक्षिणात्य सिनेमांतूनही ती झळकली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठी अपेक्षा; 'ही' मागणी पूर्ण झाली तर दीर्घकालीन प्रतीक्षा संपणार

IPS बुशरा बानो कोण? इन्शाल्लाह म्हटल्यानं वाद, तक्रारीनंतर तडकाफडकी बदली

Solapur News : वित्त आयोग निधी वाटपात पालकमंत्र्यांची मनमानी; जिल्हा परिषद सदस्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली तक्रार

IPL 2027 Auction कुठे होणार? मागील काही वर्षांत दुबई, जेद्दाह, अबु धाबी येथे झाला होता लिलाव; यावर्षी...

Marathi News Live Updates : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी, गणपतीचं घेतलं दर्शन

SCROLL FOR NEXT