Kriti Sanon Bollywood Actress comment on fans reaction esakal
मनोरंजन

Kriti Sanon : 'लोकांनी माझ्या दिसण्यावर बोलू नये', क्रिती एवढी का चिडली?

प्रसिद्ध अभिनेत्री क्रिती सेनन ही आता वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आली आहे.

युगंधर ताजणे

Kriti Sanon Bollywood Actress comment on fans reaction : प्रसिद्ध अभिनेत्री क्रिती सेनन ही आता वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आली आहे. खरं तर क्रिती सहसा एवढी प्रेक्षकांवर किंवा तिच्या चाहत्यांवर नाराज होत नाही. मात्र आता तिच्या एका प्रतिक्रियेनं चाहत्यांनाही धक्का बसला आहे. असं काय झालं की क्रितीनं थेट प्रेक्षकांना तिच्याविषयी न बोलण्याचा सल्ला दिला आहे.

क्रिती हे तिच्या आगामी 'द क्रु' मुळे लाईमलाईटमध्ये आली आहे. त्यात ती करिना कपूर आणि तब्बू यांच्यासोबत दिसणार आहे. क्रिती ही सोशल मीडियावर चर्चेत असणारी सेलिब्रेटी आहे. तिचा बोल्ड अन् बिनधास्त अंदाज हा देखील नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियेचा विषय राहिला आहे. यापूर्वी देखील तिनं वेगवेगळ्या पद्धतीनं नेटकऱ्यांना दिलेल्या उत्तरामुळे ती बातमीत आली होती. आता चक्क तिनं तिच्या दिसण्यावर लोकांनी बोलू नये असे म्हटले आहे.

Mahua Moitra : महुआ मोइत्रा यांच्यावरील कारवाई आणि वादांची मालिका

मीडियाशी बोलताना तिनं त्या गोष्टीबाबत खुलासा केला आहे. फॅशन पोलिस हा चित्रपट आल्यानंतर तिच्या लूकविषयी लोकं बोलू लागली. त्यावर क्रिती बोलत आहे. क्रिती हे खरं आहे का, चांगलं दिसण्यासाठी आरामाला सुट्टी द्यावी लागते, त्यावर क्रितीनं उत्तर दिलं आहे. ती म्हणते फॅशन पोलीसमुळे मला लोकांनी गांभीर्यानं घेण्यास सुरुवात केली. मी कसे दिसले पाहिजे याचा मला विचार जास्त महत्वाचा वाटतो.

फॅशन अशी गोष्ट आहे की, त्याचा तुम्ही आनंद घेण्याची गरज आहे. तुम्ही तुम्हाला काय कंफर्ट वाटते यावरुन फॅशनची निवड करायला हवी. तुमचे वर्क आऊट आणि फॅशन यांचाही संबंध आहे. अशावेळी तुमच्याकडे असणारा चॉईसही महत्वाचा आहे. लोकं तुमच्या फॅशनविषयी काय बोलतात हे जास्त महत्वाचे नाही. त्यांना जर आवडत नसेल तर त्यांनी बोलू नये. क्रितीची फॅशन पोलीस ही एक इंटरनॅशनल वेबसीरिज आहे. ज्यात अनेक सेलिब्रेटींची त्यांच्या फॅशनवरुन पारख केली जाते.

लोकांनी माझ्या हिल्सवर बोलू नये. त्या छोट्या आहेत की मोठ्या हे मी ठरवेल. जर अशा प्रकारची चर्चा होत असेल तर मग स्टार्स हे फॅशन सोडून आरामच करतील. मी तर पुरेशी विश्रांती घेण्यावर भर देते. मला जे योग्य वाटते त्या प्रकारची फॅशन करते. शेवटी आपला कंफर्ट महत्वाचा. असेही क्रितीनं म्हटले आहे.

क्रितीच्या प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास काही दिवसांपूर्वी तिचा टायगर सोबत गणपथ - अ हिरो इज बॉर्न नावाचा चित्रपट आला होता. त्यात बिग बी अमिताभ बच्चन यांची देखील मोठी भूमिका होती. यानंतर तिचा द क्रु नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय ती शाहिद कपूर सोबत देखील एका चित्रपटामध्ये दिसणार असल्याची चर्चा असून अद्याप त्याचे नाव समोर आलेलं नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT