Kriti Sanon Reaction On Adipurush Controversy:  Esakal
मनोरंजन

Adipurush Controversy: 'माझं लक्ष तर फक्त...', आदिपुरुषच्या जानकीचा व्हिडिओ व्हायरल..

Vaishali Patil

Kriti Sanon Reaction On Adipurush Controversy: सुपरस्टार प्रभास, क्रिती सेनन आणि सैफ अली खान स्टारर 'आदिपुरुष' या चित्रपटाबाबत सातत्याने वाद सुरू आहेत. चित्रपटाच्या डायलॉग्सपासून ते व्हीएफएक्स आणि कलाकारांच्या लूकपर्यंत लोक सर्व गोष्टींवर नाराज आहे.

त्यातच डायलॉगवरुन वातावरण तापलेलं असतांना हनुमान हे देव नव्हते ते तर फक्त भक्त होते आपण त्यांना देव बनवलं असा दावा आदिपुरुषचे संवाद लेखक मनोज मुंतशिर यांनी केला. ज्यामुळे आणखी नवा वाद सुरु झाला.

या सगळ्यावर आता आदिपुरुषमध्ये जानकीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री क्रिती सॅननचं कौतुक करण्यात आलं आहे. चाहत्यांना तिचा अभिनय आवडला. मात्र तिने या वादावर काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती.

मात्र आता तिने सोशल मिडियावर तिने एक व्हिडिओ शेयर केला आहे. ज्यामध्ये तिने ट्रोल करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे. तिने सोशल मीडियावर एक गूढ पोस्ट शेअर केली आहे परंतु त्याच्या चाहत्यांच्या भावना व्यक्त करणारा हा व्हिडिओ आहे.

क्रितीनं या पोस्टच्या माध्यमातून चित्रपटाला मिळत असलेला सकारात्म प्रतिसाद दाखवला आहे.

'आदिपुरुष'ला मिळणाऱ्या टाळ्या आणि जयघोषाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओंमध्ये प्रभास, सनी, सैफ अली खान आणि क्रिती यांचे चित्रपटातील काही सीन्स आहेत, ज्यावर प्रेक्षक खूप टाळ्या आणि शिट्या वाजवत आहेत.

'चिअर्स आणि टाळ्यांवर लक्ष केंद्रित करत आहे! जय सिया राम...' असं कॅप्शनही तिनं या व्हिडिओला दिल आहे.

थोडक्यात आदिपुरुषची होणारी ट्रोलिंग आणि वादावर लक्ष न देता ती केवळ सकारात्म बाजूने या सर्व प्रकरणाला हाताळत असल्याच तिनं या पोस्टमधुन सांगितलं आहे.

आदिपुरुष या रामायणावर आधारित चित्रपटावर बरीच टीका केली जात आहे., चित्रपटाचे संवाद, व्हीएफएक्स आणि काही त्रुटींमुळे आदिपुरुषला नकारात्मक प्रतिक्रिया मिळत असल्या तरी चित्रपटाने वीकेंडला चांगली कमाई केली मात्र सोमवारी आदिपुरुषच्या कमाईत घट झाली.

'आदिपुरुष' च्या कमाईवर सोमवारी बॉक्स ऑफिसवर वीकेंडच्या तुलनेत चित्रपटाच्या कमाईत 70 टक्क्यांनी घट झाली आहे. Sacnilk च्या सुरुवातीच्या ट्रेंडनुसार आदिपुरुषने सोमवारी फक्त 20 कोटी कमावले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT