vivek and kamal rashid khan  Team esakal
मनोरंजन

'भावा, तुझं करिअर कोणी उद्धवस्त करु शकणार नाही'

काही दिवसांपासून कमाल राशिद खान (kamal khan rashid) सोशल मीडियावर (social media) ट्रेडिंगचा विषय आहे.

युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडचा अभिनेता विवेक ऑबेरॉय (bollywood actor vivek oberoi) आणि कमाल खान (kamal khan) यांच्यातील व्टिटर संभाषण आता व्हायरल झाले आहे. केआरकेनं त्याची बाजूनं काही व्टिट केले आहेत. ते सोशल मीडियावर (social media) चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून केआरके (krk) चर्चेत आला आहे. त्याचे कारण म्हणजे त्यानं बॉलीवूडचा भाईजान सलमान खानशी (salman khan) पंगा घेतला आहे. त्याच्या राधे चित्रपटावर टीका केल्यानं केआरकेनं सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. (KRK Lauds Bhai Vivek Oberoi For Calling Out Bollywood After Amid Feud With Salman Khan)

काही दिवसांपासून कमाल राशिद खान (kamal khan rashid) सोशल मीडियावर (social media) ट्रेडिंगचा विषय आहे. सलमाननं तर त्याच्या विरोधात कोर्टात धाव घेतली आहे. त्यानं आता सलमानचे ज्यांच्यांशी भांडणे आहेत त्यांच्याबाजून व्टिट करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या आठवड्यात त्यानं जॉन अब्राहम, गायक अरिजीत सिंग यांच्या बाजूनं एक व्टिट केले होते. तर काल मिका सिंगनं कमाल खानवर टीका करत त्याच्यावर एका गाण्याची निर्मिती करुन त्याचा टीझर व्हायरल केला होता.

कमालनं एक व्टिट करुन ते विवेकला टॅग केले आहे. त्यात त्यानं त्याला भाई असं म्हटलं आहे. सलमान आणि विवेक यांच्यातील भांडणे सर्वांना माहिती आहेत. जेव्हा सलमान आणि त्याच्यात भांडणे झाली तेव्हारपासून विवेकचे बॉलीवूडमधील करिअर संपल्याची चर्चा आहे. केआरकेनं तो मुद्दा उचलून एक व्टिट केलं आहे.

त्या व्टिटमध्ये तो म्हणतो, विवेक भाई, तुमची मुलाखत पाहिली. ती चांगली होती. त्यात तु जे सांगितले ते खरे होते. तु पुढे जात राहा. मी तुझ्या पाठीशी आहे. याशिवाय त्यानं आणखी एक व्टिट केले आहे. त्यात त्यानं म्हटलयं, मित्रांनो तुम्ही जर भाईगिरीमुळे त्रासले असाल तर बिनधास्त माझ्याशी बोला. कोणीही कुणाचे करिअर उद्घवस्त करु शकणार नाही. हे लक्षात ठेवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT