krushna abhishek Latest News  krushna abhishek Latest News
मनोरंजन

Viral Video : कपिल शर्माकडून कृष्णा अभिषेकला ‘मुफ्त की मसाज’; पैसे म्हणताच...

कपिल शर्मा मोफत मसाजचा आनंद घेत आहे

सकाळ डिजिटल टीम

krushna abhishek Latest News कपिल शर्मा (Kapil Sharma) आपल्या शोमुळे खूप चर्चेत आहे. मात्र, त्याच्या शोमध्ये कृष्णा अभिषेक असणार नाही, अशी अफवा काही काळापूर्वी पसरली होती. कपिल शर्मा आणि कृष्णा (Krushna Abhishek) यांच्यात भांडण झाल्याचे समजले होते. मानधनावरून दोघांमध्ये वाद झाल्याच्या बातम्याही आल्या होत्या. यामुळे अभिषेकच्या चाहत्यांना मोठा झटका बसला आहे. परंतु, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कृष्णा अभिषेक आणि कपिल शर्मा एकत्र दिसत आहेत. काय आहे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया.

व्हायरल व्हिडिओमध्ये कपिल शर्मा आणि कृष्णा अभिषेक (Krushna Abhishek) एकत्र दिसत आहेत. कपिल शर्माने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करीत कपिल शर्माने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘फ्री मसाज’. व्हिडिओमध्ये कपिल आणि कृष्णा खुर्चीवर बसून १५ मिनिटांसाठी मोफत मसाजचा आनंद घेताना दिसत आहेत.

मसाज करणाऱ्या मुलीला कृष्णा प्रश्न विचारत आहे. मसाज किती वेळ चालेल? मसाजसाठी पैसे घेतले जाईल का? १५ मिनिट मसाज निःशुल्क राहील. १५ मिनिटानंतर मसाजसाठी पैसे आकारले जाईल, असे मुलीने कृष्णाला सांगितले. यानंतर कृष्णा अभिषेक (Kapil Sharma) आणि कपिल शर्मा दोघेही आपल्या जागेवरून उठतात. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘द कपिल शर्मा शो’ प्रेक्षकांना नेहमीच आवडतो. या शोमध्ये अनेक बॉलिवूड कलाकार सहभागी होतात आणि आयुष्याशी संबंधित वेगवेगळ्या गोष्टी प्रेक्षकांसोबत शेअर करतात. आतापर्यंत अभिनेते कपिल शर्मा, कृष्णा अभिषेक, भारती सिंग, किकू शारदा या शोमध्ये त्यांच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खूप हसवतात. या शोचा नवा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

व्हिडिओवर कमेंट करताना एका चाहत्याने लिहिले, मला आशा आहे की संपूर्ण टीम पुन्हा एकदा एकत्र येईल. दुसऱ्या युजरने लिहिले, कृष्णाला परत आणा.' कपिल शर्मा, कृष्णा अभिषेक, किकू शारदा आणि उर्वरित टीम बुधवारी रात्री ऑस्ट्रेलियाला रवाना झाले. ‘द कपिल शर्मा शो’च्या नव्या सीझनमध्ये कृष्णा अभिषेक दिसणार नसल्याची अफवा काही काळापूर्वी पसरली होती. यावर कृष्ण म्हणाला, काही अडचण नाही. मी त्याच्यावर प्रेम करतो आणि तो माझ्यावर प्रेम करतो. माझाही तो शो आहे. मी पुन्हा येईन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT