krushna abhishek Latest News krushna abhishek Latest News
मनोरंजन

Krushna Abhishek : अखेर कृष्णाने ‘कपिल शर्मा शो’बद्दल स्पष्टच सांगितले; हा शो...

अलीकडेच कपिल शर्मा शो सीझन ३ च्या कलाकारांच्या नावाची घोषणा करण्यात आली

सकाळ डिजिटल टीम

krushna abhishek Latest News ‘द कपिल शर्मा शो’च्या सीझन ३ मध्ये कृष्णा अभिषेक दिसणार नाही याबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. कपिल शर्मा (Kapil Sharma) आणि कृष्णा अभिषेक (Krushna Abhishek) यांच्यात भांडण झाल्याचेही सांगितले जात आहे. मात्र, दोघांचा सोबत असलेला व्हिडिओ व्हायरल झाला. व्हिडिओत दोघेही मस्ती करताना दिसले. आता कृष्णाने शोबद्दल साधलेले मौन सोडले आहे. शोमध्ये परत येणार की नाही याबद्दल सांगितले आहे.

‘द कपिल शर्मा शो’च्या नवीन सीझनमध्ये न दिसण्यावर अभिनेता कृष्णा अभिषेकने उत्तर दिले आहे. ‘तू या शोला किती मिस करणार आहे. तुझ्यासोबत प्रेक्षकही तुला या शोमध्ये मिस करतील’ असा प्रश्न पत्रकारांनी कृष्णाला विचारला. उत्तरात कृष्णा म्हणाला, ‘अशा अफवा कोण पसरवत आहे हे मला माहीत नाही.’

‘कपिल आणि मी खूप चांगले मित्र आहोत. आज रात्री कपिल (Kapil Sharma) आणि मी एकत्र ऑस्ट्रेलियाला जाणार आहोत. मी त्याच्यावर प्रेम करतो आणि तो माझ्यावर प्रेम करतो. तो माझाही शो आहे. मी शोमध्ये परतणार आहे’, असेही कृष्णा अभिषेक (Krushna Abhishek) म्हणाला. काही दिवसांपूर्वी कृष्णा एका मुलाखतीत म्हणाला होता की, ‘द कपिल शर्मा शो’ मी करीत नाही आहे. शोच्या कराराचे कारण आहे.

अलीकडेच कपिल शर्मा शो सीझन ३ च्या कलाकारांच्या नावाची घोषणा करण्यात आली. बुधवारी व्हिडिओ क्लिप शेअर करून नवीन कलाकार आणि त्यांच्या पात्रांची माहिती देण्यात आली. नेहमीप्रमाणे कप्पू शर्माच्या भूमिकेत कपिल शर्मा, त्याची पत्नी बिंदूच्या भूमिकेत सुमोना चक्रवर्ती, कप्पूचा मित्र चंदनच्या भूमिकेत चंदन प्रभाकर आणि किकू शारदा दिसणार आहे. नवीन कलाकार अभिनेत्री सृष्टी रोडे शोमध्ये कपिलच्या प्रेमाची आवड असलेल्या गझल शर्मची भूमिका साकारताना दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT