Kumar Sanu  esakal
मनोरंजन

Kumar Sanu : 'बंदूकीचा धाक दाखवून सोळा वेळा एकच गाणं गायला लावलं!'

कुमार सानू यांनी आपल्या एका लाईव्ह शो दरम्यान घडलेला किस्सा सांगताच चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

युगंधर ताजणे

Unheard Story Of Kumar Sanu : आशिकीमधील गाणी ज्यांनी ऐकली असतील त्यांना कुमार सानू कोण हा प्रश्न काही पडणार नाही. आपल्या बहारदार गायकीनं त्यांनी गेल्या तीन दशकांहून अधिक काळ चाहत्यांच्या मनावर अधिराज्य केले आहे. सध्या कुमार सानू त्यांच्या एका वेगळ्याच प्रसंगामुळे चर्चेत आले आहे. त्याची चर्चा होताना दिसते आहे.

बॉलीवूडमधील लोकप्रिय गायक कुमार सानू हे ९० च्या दशकांतील सर्वोत्तम गायक. आजही त्यांची गाणी चाहते तितक्याच प्रेमानं ऐकतात. त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव करतात. कुमार यांनी आपल्या करिअरमध्ये अशी काही गाणी गायली की त्याची लोकप्रियता इतक्या वर्षांनी देखील चाहत्यांच्या मनात कायम आहे. जेवढी लोकप्रियता जास्त तितकाच तुमचे शत्रुही जास्त असे कुमार सानुंच्याबाबत घडले होते.

Also Read - ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

कुमार सानु यांनी केवळ हिंदीच नाहीतर मराठी, नेपाळी, भोपाली, मल्याळम, गुजराती, आसामी, तमिळ आणि पंजाबी भाषेत गाणी गायली आहेत. त्यांची मुळ भाषा ही बंगाली. त्यामध्ये देखील त्यांनी अवीट सुरावटींची गाणी गायली आहेत. कपिल शर्माच्या शोमध्ये आलेल्या कुमार सानू यांनी जो प्रसंग सांगितला त्यानं चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. कुमार सानू यांचा पटनामध्ये लाईव्ह शो होता. त्यावेळी जे घडलं होतं ते भयानक असल्याचे त्यांनी सांगितले.

पटनामध्ये शो सुरु होता. त्यांना गाणी खूप आवडली. चाहते दाद देत होते. अशात स्टेजच्या समोर एके ४७ घेऊन जी लोकं बसली होती. त्यांनी तर गाणं आवडल्यावर हवेत गोळीबार करण्यास सुरुवात केली होती. अशातच स्टेजवर देखील काही गोळ्या पडल्या होत्या. अशातच मैं दुनिया भुला दुंगा हे गाणं गायल्यानंतर दुसरं गाणं गायला घेतलं. त्यात त्या बंदुकधारी लोकांनी मला पहिलं गाणं बंद का केलं असं विचारलं. तुला पुन्हा मैं दुनिया भुला दुंगा हे गाणं गायला लागेल. या शब्दांत दटावलं.

मी त्या लोकांना दुसरं गाणं गातो असं खूप वेळा सांगण्याचा प्रयत्न केला. पण ते काही केल्या ऐकायला तयार नव्हते. मला बंदुकीचा धाक दाखवून ते गाणं माझ्याकडून तब्बल १६ वेळा गाऊन घेतलं होतं. अशी आठवण कुमार सानू यांनी सांगितल्यावर कपिलच्या शोमध्ये उपस्थित चाहत्यांना तर मोठा धक्काच बसला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari Ethanol News : ई-२० नंतर आता शंभर टक्के इथेनॉलवर धावणाऱ्या वाहनांवर भर; नितीन गडकरींची मोठी घोषणा

कीर्तनातून प्रसिद्ध झालेल्या तरुणीची भन्नाट गोष्ट; ‘पाच फुटाचा बच्चन’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता

IND vs WI 2nd ODI : वेस्ट इंडिजने इतिहास घडवला! सर्वोच्च धावसंख्या, भारताविरुद्ध वर्ल्ड रेकॉर्ड; कॅम्बेल, होप अन् जांगूचे शतक, ४०० पार

Latest Marathi News Live Update : कर्नाटकातील 'मंगळूर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड'मध्ये अचानक भीषण आग

कसाबच्या भूमिकेत ललित प्रभाकरला पाहून येईल चीड; राजकुमार रावही जबरदस्त, 'प्रहार' चा ट्रेलर बनला चर्चेचा विषय

SCROLL FOR NEXT