kumar sanu Sakal
मनोरंजन

Kumar Sanu: या प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्यासोबत कुमार सानू यांची मुलगी बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण, चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज

प्रसिद्ध गायक कुमार सानू यांची मुलगी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तिच्या डेब्यू चित्रपटाचे मोशन पोस्टरही रिलीज झाले आहे.

Aishwarya Musale

मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध आणि दिग्गज गायक कुमार सानू यांचा आवाज सर्वांना आवडतो. आता त्यांच्यानंतर त्यांची मुलगी शॅननही बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. ती लवकरच अभिनेत्री म्हणून पदार्पण करणार आहे. तिच्या 'चल जिंदगी' या डेब्यू चित्रपटाचे मोशन पोस्टर समोर आले आहे.

'चल जिंदगी' हा रोड ट्रिपवर आधारित चित्रपट असणार आहे, ज्याचे दिग्दर्शन विवेक शर्मा करत आहेत. या चित्रपटात शॅननसोबत टीव्ही अभिनेता विवेक दहिया दिसणार आहे. त्याचबरोबर संजय मिश्रा, विवान शर्मा आणि मीता वशिष्ठ हे देखील या चित्रपटाचा एक भाग आहेत. विवेकचा शॅननसोबतचा हा डेब्यू चित्रपट आहे. याआधी त्याने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे.

मेकर्सनी 3 एप्रिल रोजी या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज केले आहे, जे शॅननने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. हा चित्रपट रोड ट्रिपवर आधारित असल्याने त्याची झलक या मोशन पोस्टरमध्ये स्पष्टपणे दिसते. शॅनन, विवेक दहिया आणि इतर स्टार्स बाइकवरून रोड ट्रिपचा आनंद लुटताना दिसत आहेत.

शॅनन एक अभिनेत्री सोबतच गायिका देखील आहे. तर चल जिंदगीमध्ये तिने वडिलांसोबत दोन गाण्यांनाही आवाज दिला आहे. मात्र, हा चित्रपट कधी दिसणार, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

शॅनन आतापर्यंत लाइमलाइटपासून दूर आहे. मात्र, असे असूनही सोशल मीडियावर तिचे फॅन फॉलोअर्स आहे. इन्स्टाग्रामवर तिला ३.४ मिलियन म्हणजेच ३४ लाखांहून अधिक लोक फॉलो करतात. ती अनेकदा फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT