Kumar Sanu Son Jan Kumar angry reaction my father esakal
मनोरंजन

Jaan Kumar : 'माझ्या करिअरमध्ये बापानचं आणला अडथळा', कुमार सानूच्या मुलाची खंत!

बिग बॉसमध्ये देखील आपल्या परखड स्वभावामुळे अनेकांच्या टीकेचा धनी झालेल्या जान सानूला सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या टीकेला सामोरं जावं लागलं आहे.

युगंधर ताजणे

Kumar Sanu Son Jan Kumar angry reaction my father : आपल्या सदाबहार आवाजानं नेहमीच चाहत्यांच्या मनात आदराचे स्थान असलेल्या कुमार सानूच्या गाण्यांना अजुनही जोरदार प्रतिसाद मिळताना दिसतो. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ कुमार सानू यांच्या सुरांची जादू प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे. कुमार सानूंचा मुलगा जान कुमार सानू देखील चांगला गायक आहे. मात्र बाप लेकांमध्ये नेहमीच वाद असल्याचे दिसून आले आहे.

बिग बॉसमध्ये देखील आपल्या परखड स्वभावामुळे अनेकांच्या टीकेचा धनी झालेल्या जान सानूला सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या टीकेला सामोरं जावं लागलं आहे. आता देखील त्यानं पुन्हा दिलेल्या प्रतिक्रियेनं तो चर्चेत आला आहे. बॉलीवूडमध्ये अनेक गायकांची मुलं चांगल्या करिअरमध्ये आहेत. मात्र आपल्याला अजून स्थिर होता आले नाही. याविषयी जान सानूनं दिलेली प्रतिक्रिया नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

Also Read - सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

मला माझ्या वडिलांनी कधीच मदत केलेली नाही. त्यांनी थोडा जरी हातभार लावला असता तर मी आज माझ्या पायावर उभा राहिला असतो. माझ्या करिअरमध्ये मोठा अडथळा तयार करण्यात माझ्या वडिलांचा मोठा वाटा आहे. अशी जळजळीत प्रतिक्रिया जान सानूनं दिली आहे. ती प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्यावर आलेल्या प्रतिक्रिया देखील भलत्याच तिखट आहेत. मला आजवर इंडस्ट्रीमध्ये देखील कुणीही मदत केली नाही. याचे कारण माझे वडील आहे. असेही जाननं म्हटले आहे.

मी बॉलीवूडमध्ये यावं यासाठी माझे वडील कुमार सानू यांनी कधीच माझी मदत केलेली नाही. अशी प्रतिक्रिया जाननं दिली आहे. एका मुलाखतीध्ये त्यानं याविषयी स्पष्टपणे सांगितले आहे,तो म्हणतो, जर माझ्या वडिलांनी मला सहकार्य केले असते तर मी आज या संगीत विश्वात प्रसिद्ध झालो असतो. पण तसे झाले नाही. ईटाईम्ससोबत बोलत असताना त्यानं याविषयावर सविस्तरपणे त्याची भूमिका मांडली आहे. आता मला त्यांच्याविषयी कोणतीही खंत नाही. त्यामुळे त्याचा फारसा विचार करत नाही.

मला माझ्या वडिलांविषयी फारसे माहिती नव्हते. माझी आईच हेच माझे वडील होते. तिनं मला वाढवलं. एक गायक म्हणून देखील तिनं मला वेळोवेळी मार्गदर्शन केले. आज जे काही आहे त्यात तिचा वाटा महत्वाचा आहे. अशी भावना जाननं यावेळी व्यक्त केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma: 'अद्भूत कर्णधार, टीम इंडियाला तू शिकवलंस की...' दिनेश कार्तिकचा रोहितच्या नेतृत्वाला सलाम; पाहा Video

30th Fenesta Open Tennis: महाराष्ट्राच्या वैष्णवी अडकरने जिंकले विजेतेपद; मनिष सुरेशकुमार पुरुष विभागात विजेता

सातारा अन् पालघर जिल्ह्यातील दोन न्यायाधीश सेवेतून बडतर्फ; नेमकं प्रकरण काय?

Phulambri Protest : शेतकऱ्यांच्या मदतीवरून काँग्रेस आक्रमक तहसीलदार व काँग्रेस कार्यकर्त्यांत बाचाबाची

Latest Marathi News Live Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT