Kumar Vishwas wife Manju Sharma birthday story viral  esakal
मनोरंजन

Kumar Vishwas wife Manju Sharma : 'तुझको गाड़ी चलाना न आया मगर, मेरी गाडी...'

कुमार विश्वास हे नेहमीच त्यांच्या राजकीय आणि सामाजिक मुद्दयांवरुन चर्चेत आल्याचे दिसून आले आहे. ते आपल्या परखड व्यक्तिमत्वासाठी ओळखले जातात.

युगंधर ताजणे

Kumar Vishwas wife Manju Sharma birthday story : कुमार विश्वास हे नेहमीच त्यांच्या वेगळ्या अंदाजासाठी ओळखले जातात. त्यांच्या कविता, शायरी वेगवेगळ्या रचना या सोशल मीडियावर तरुणांच्या खास कुतूहलाचा आणि चर्चेचा विषय आहे. देशातील सर्वाधिक लोकप्रिय कवींमध्ये कुमार विश्वास यांचे नाव घ्यावे लागेल. कुमार विश्वास यांनी त्यांच्या पत्नीला जन्मदिनाच्या निमित्तानं दिलेल्या शुभेच्छा या आता चर्चेत आल्या आहेत.

कोई दिवाना कहता है, कोई पागल समझता है ही कविता त्यांची प्रचंड लोकप्रिय झाली होती. अजुनही सोशल मीडियावर त्याचे व्हिडिओ आणि रिल्स व्हायरल होत असतात. खासकरुन तरुणाईमध्ये त्या जास्त लोकप्रिय असल्याचे दिसून आले आहे. शायरीच्या माध्यमातून डॉ.कुमार विश्वास यांनी तरुणाईंच्या मनात आदराचे स्थान मिळवले आहे. त्यामुळे ते नेहमीच चर्चेत राहिले आहे.

Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

कुमार विश्वास हे नेहमीच त्यांच्या राजकीय आणि सामाजिक मुद्दयांवरुन चर्चेत आल्याचे दिसून आले आहे. ते आपल्या परखड व्यक्तिमत्वासाठी ओळखले जातात. यासगळ्यात त्यांच्या कविता मनाला वेगळी उभारणी देतात. कुमार विश्वास यांनी त्यांच्या पत्नीला वाढदिवसानिमित्त त्यांच्या खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी त्यांच्या शिक्षिकेशी लग्न केलं होतं.

कुमार विश्वास यांची ती पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यामध्ये ते म्हणतात की, ही माझी कविता मी पत्नी मंजू शर्मासाठी आहे. तिच्यासाठी खास केली आहे. “तुझको गाड़ी चलाना न आया मगर, मेरी गाड़ी न चल पाए तेरे बिना…”न जन्मदिन मुबारक मुहब्बत…यूँ ही साथ चलती रहो ? त्यांच्या या कवितेला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

कुमार विश्वास आणि मंजु शर्मा यांची लवस्टोरी ही १९९४ मध्ये सुरु झाली. कुमार विश्वास यांनी इंजिनिअरींग सोडून मंजु शर्मा ज्या महाविद्यालयात लेक्चरर होत्या त्याच कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pahalgam Terrorist Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत मोठा खुलासा; NIAने सांगितलं बैसरन खोऱ्यालाच का केलं गेलं लक्ष्य?

Ganpati Visarjan Tragedy: कोकणात गणपती विसर्जनावेळी तीनजण जगबुडी नदीत गेले वाहून, मात्र...

Mumbai News: आझाद मैदानासह परिसर मराठा आंदोलकांनी गजबजला, जरांगे यांची मुंबईच्या दिशेने आगेकूच

अल्पसंख्य सदस्यांना घरे रिकामी करण्याचे आदेश, वसईतील धोकादायक इमारतीप्रकरणी उच्च न्यायालयाची टिप्पणी

‘डीजेमुक्त सोलापूर’साठी शाळकरी मुली उतरल्या रस्त्यावर! अभ्यास, आरोग्य, पर्यावरणावर डीजेचा दुष्परिणाम, डीजेची दहशत थांबविण्याची मागणी

SCROLL FOR NEXT