Manit Joura Wedding esakal
मनोरंजन

Manit Joura Wedding: 'कुंडली भाग्य' फेम मनितचं गुपचूप लग्न! उदयपुरमध्ये रंगला विवाहसोहळा

कुंडली भाग्य मालिकेचा प्रमुख कलाकार ऋषभ अर्थात मनित जोरानं लग्न केलं आहे

युगंधर ताजणे

Manit Joura Wedding: टीव्ही मनोरंजन विश्वातून एक गोड बातमी समोर आली आहे. कुंडली भाग्य ही मालिका प्रेक्षकांच्या नेहमीच कौतूकाचा विषय राहिला आहे. या मालिकेनं आतापर्यत लाखो व्ह्युअर्सचा टप्पाही पार केला आहे. मालिकेतील मुख्य कलाकारांच्याबाबत मोठी बातमी चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

कुंडली भाग्य मालिकेचा प्रमुख कलाकार ऋषभ अर्थात मनित जोरानं लग्न केलं आहे. खरं तर त्यानं या महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात आपल्या गर्लफ्रेंडशी लग्न केले होते. मात्र सोशल मीडियावर त्यानं फोटो व्हायरल केल्यानं वेगळ्याच चर्चांना उधाण आले आहे. लग्नानंतर त्यानं बारा दिवसांनी त्यानं फोटो पोस्ट केल्यानंतर चाहत्यांनी त्याला वेगवेगळे प्रश्न विचारुन भंडावून सोडले आहे. मनितनं ग्रीक मध्ये राहणाऱ्या त्याच्या पेनागियोटोपोलू सोबत लग्न केल्याच्या चर्चां रंगल्या होत्या.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

एंड्रिया ही डान्स टीचर आहे. दोन्ही सेलिब्रेटींनी गेल्या काही दिवसांपासून सिक्रेट ठेवले होते. आता त्यांनी फोटो व्हायरल करुन चाहत्यांना गोड धक्का दिला आहे. त्या दोघांनी उदयपूरमध्ये एका हॉटेलमध्ये लग्न केल्याचे सांगितले जाते. यावेळी ऋषभनं ई टाईम्सशी बोलताना म्हटले होते की, मी लग्नाबाबत फारच स्पष्ट होतो. लग्न हा खूपच वैयक्तिक विषय आहे. मात्र आम्ही त्याविषयी जास्त सोशलाईज होण्याचा निर्णय घेतला नाही.

आमच्या लग्नाबाबत कुणाला जास्त माहिती नव्हते. ते कुणाला माहिती होऊ नये याविषयी काळजी घेतली आहे. लग्नामध्ये मनित हा १०८ वर्षे जूनी तलवार घेऊन गेला होता. ती तलवार त्यांच्या पूर्वजांची निशाणी असल्याचे म्हटले जाते. त्यावर त्याच्या कुटूंबियांची नावंही छापली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT