Kushal Badrike esakal
मनोरंजन

Kushal Badrike: "शोधून सापडणार नाहीत अशी माणसं आयुष्यातून निघून गेली की..."; कुशल बद्रिकेच्या 'त्या' पोस्टनं वेधलं लक्ष

Kushal Badrike: कुशलनं एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

priyanka kulkarni

Kushal Badrike: अभिनेता कुशल बद्रिके (Kushal Badrike) हा त्याच्या विनोदी शैलीनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असतो. कुशल हा सोशल मीडियावर देखील अॅक्टिव असतो. त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते. अशताच आता कुशलनं एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

कुशलची पोस्ट

कुशलनं त्याचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोला त्यानं कॅप्शन दिलं, “शोधून सापडणार नाहीत”, काही अशी माणसं आयुष्यातून निघून गेली ना, की माणसं “एकलकोंडी” होत जातात. फक्त स्वतःची होत जातात, स्वतः मधेच रमत राहतात आणि मग, आयुष्यातून आणखीन माणसं गमावून बसू ह्या भीती पोटी हे लोक माणसं कमवायचीच राहून जातात. अशा एकाकी माणसांना त्यांच्यावर सच्च प्रेम करणारं कुणीतरी हवं असतं. बास!:-सुकून." कुशलच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

अनेक नेटकऱ्यांनी कुशलनं शेअर केलेल्या पोस्टला कमेंट्स केल्या आहेत. "खूप छान लिहितोस यार.... शेवटी एकटाच पडतो माणूस..." अशी कमेंट एका नेटकऱ्यानं कुशलच्या पोस्टला केली आहे. तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "कुशल सर, तुमचं खरं आहे."

'चला हवा येऊ द्या'मुळे मिळाली लोकप्रियता

चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामुळे कुशलला विशेष लोकप्रियता मिळाली. या कार्यक्रमात कुशल विविध भूमिका साकारुन प्रेक्षकांचे मनोरंजन करतो. या कार्यक्रमात भालचंद्र कदम, सागर कारंडे, श्रेया बुगडे,भारत गणेशपुरे हे कलाकार देखील काम करतात.

कुशलनं 'या' चित्रपटांमध्ये केलं काम

माझा नवरा तुझी बायको,जत्रा,बकुळा नामदेव घोटाळे आणि पांडू या चित्रपटामध्ये कुशलनं महत्वाची भूमिका साकारली आहे. तसेच जागो मोहन प्यारे,लाली लाल या नाटकांमध्ये देखील कुशलनं काम केलं आहे. कुशलच्या आगामी प्रोजेक्ट्सची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SL vs AUS : पथूम निसंका पहिला शतकवीर! श्रीलंका Super 8s मध्ये, ऑस्ट्रेलियाचे नशीब 'आयर्लंड'च्या हाती; जाणून घ्या समीकरण

Surya Grahan 2026: वर्षातील पहिले सूर्यग्रहण 'या' 3 राशींसाठी ठरु शकते धोकादायक, 'हे' उपाय करा नाहीतर होईल मोठी हानी!

Muhammad Yunus Resigns : मुहम्मद युनूस यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या मुख्य सल्लागारपदाचा दिला राजीनामा!

Mani Shankar Aiyar : ‘’मी गांधीवादी, नेहरूवादी, राजीववादी आहे, पण राहुलवादी नाही’’ ; काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर थेटच बोलले..!

Pune Shivjayanti : रस्त्याच्या कामामुळे शिवजयंती मिरवणूक मार्गात बदल; महापौरांचे आदेश

SCROLL FOR NEXT