Kushi Box Office Collection Day 2: Esakal
मनोरंजन

Kushi Box Office Collection Day 2: विजय सामंथाच्या जोडी पुढे ड्रिम गर्ल पडली फिकी! कुशी'ने दुसऱ्या दिवशी केली बक्कळ कमाई!

Vaishali Patil

Kushi Box Office Collection Day 2: गेल्या महिन्यात काही बॉलिवूड चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला. त्यात गदर2 , OMG2 हे चित्रपट प्रदर्शित झाले तर साऊथ सुपरस्टार रजनीकांतच्या जेलरने देखील बॉक्स ऑफिसवर राडा केला.

आता सध्या एकीकडे आयुष्यानचा ड्रीम गर्ल 2 सिनेमा प्रदर्शित झाला तर त्याला टक्कर देण्यासाठी विजय देवरकोंडा आणि सामंथा रुथ प्रभू यांचा 'कुशी' मैदानात आला. कुशी हा चित्रपट 1 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे.

या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहेत. या चित्रपटातील विजय आणि सामंथाची जोडी प्रेक्षकांना खुप आवडली आहे. त्याचा फायदा चित्रपटाच्या कमाईला होत आहे.

कुशी या चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे यांच्या 'ड्रीम गर्ल 2' पेक्षा जास्त होती. तर आता या चित्रपच्या दुसऱ्या दिवसाच्या कमाईचे आकडेदेखील समोर आले आहेत.

बॉक्स ऑफिस रिपोर्टरनुसार, पहिल्या दिवशी 15.25 कोटीची कमाई करणाऱ्या कुशीने दुसऱ्या दिवशी 10 कोटींचा गल्ला जमवला आहे. या आकडेवारीसोबत आता कुशीचे एकूण कलेक्शन 25.25 कोटींवर गेले आहे.

या आकडेवारीत अशीच वाढ होत राहिली तर हा विजयचा तब्बल पाच वर्षानंतरचा हिट सिनेमा ठरेल तर सामंथाचा यशोदा आणि शकुंतलम फ्लॉप झाल्यानंतर हा चित्रपट तिच्या करियरसाठी चांगली कमागिरी करणारा ठरेल.

तर दुसरीकडे 'ड्रीम गर्ल 2' बद्दल बोलायचं झाल्यास या चित्रपटाने पहिल्या दिवशी केवळ 10 कोटींची कमाई केली. आणि दुसऱ्या दिवशी 14.02 कोटी. त्यामुळे कुशीच्या कमाईचे आकडेवारीनुसार 'कुशी' लवकरच 'ड्रीम गर्ल 2'ला मागे सोडणार असं बोलल्यास वावगं ठरणार नाही.

'ड्रीम गर्ल 2' रिलीज होऊन 9 दिवस झाले आहेत. रिलीजच्या 8 व्या दिवशी चित्रपटाने खुप कमी कमाई केली. चित्रपटाने 9व्या दिवशी 6 कोटींचा व्यवसाय केला आहे आणि यासोबत आयुष्मान खान स्टारर चित्रपटाचे एकूण कलेक्शन 77.70 कोटी रुपये झाले आहे.

त्यातच आता विजय आणि सामंथाचा कुशी किती कमाई करतो याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. मात्र त्यातच कुशीला आता शाहरुख खानच्या जवान चित्रपटाचाही धोका आहे. कारण हा सिनेमा देखील पुढच्या आठवड्यात रिलिज होणार आहे. त्यामुळे कुशी चित्रपटासाठी हा आठवडा खुप महत्वाचा असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT