Kushi Twitter Reviews Samantha Prabhu Vijay Deverakonda's love story Film Tweet Viral Fans Reaction  esakal
मनोरंजन

Kushi Twitter Review: सामंथा अन् विजयनं प्रेक्षकांना दिली खुप मोठी 'खुशी' नेटकरी म्हणताय,...

Vaishali Patil

Kushi Twitter Review: काही दिवसापासून मनोरंजन विश्वात अनेक चित्रपटांची जत्रा भरली आहे. त्यात बॉलिवूड आणि टॉलिवूड सिनेमांची देखील चागंलीच हवा आहे. मग त्यात सनी देओलचा गदर 2 असो किंवा OMG2, ड्रिम गर्ल 2 मात्र या तिनही चित्रपटांना टक्कर देत होता तो टॉलिवूड रजनीकांतचा जेलर . या सिनेमाने कमाईचे अनेक रेकॉर्ड मोडले.

आता त्यातच साउथचा मोस्ट अवेटेड रोमँटिक म्युझिकल ड्रामा 'कुशी' ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. विजय देवरकोंडा आणि सामंथा रुथ प्रभू यांची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर प्रेक्षकाचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज होते.

या चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी देखील प्रेक्षकांना खुपच आवडली. या चित्रपटाच्या अॅडवान्स बुकिंगलाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता त्यातच हा सिनेमा आज प्रदर्शित झालाय.

या चित्रपटात सामंथा आणि विजय यांची प्रेमकथा प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शिव निर्वाण यांनी केले आहे. दोघांचे चाहते या चित्रपटासाठी उत्सूक होते.

हा सिनेमा दोघांच्या करियरसाठी खुप महत्वाचा आहे. कारण एकीकडे विजयचा 'लायगर ' बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला, तर सामंथाचा 'यशोदा' आणि 'शकुंतलम'हा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही.

त्यामुळे दोघांच्या चाहत्यांना 'कुशी' या सिनेमाकडून खुप अपेक्षा आहेत. तर आता अनेकांनी हा सिनेमा पहिल्याच दिवशी पाहिला. सनेमा पाहिल्यानंतर चित्रपटगृहातून बाहेर पडलेल्या प्रेक्षकांचा त्याबद्दल ट्विटवर रिव्ह्यू शेयर केले आहेत. आता यावरुन प्रेक्षकांचा या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं दिसत.(Latest Marathi News)

समंथा-विजयची प्रेमकथा, चित्रपटाचे संगीत आणि कथा प्रेक्षकांना आवडते. विशेषत: तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये 'कुशी' प्रेक्षकांच्या अपेक्षांवर खरा उतरला आहे.

चित्रपट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी या सिनेमाला ब्लॉकबस्टर सिनेमा म्हटलं आहे. #Blockbusterkushiहा ट्रेंड सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

एकानं लिहिलयं, "फर्स्ट क्लास चित्रपट. कुशी सिनेमा ब्लॉकबस्टर ठरणार आहे."

तर दुसऱ्याने लिहिलयं की, "फर्स्ट हाफ संपला, क्यूट जोडी, कॉमेडी सीन्स उत्तम आहेत, एकूणच हा चित्रपट चांगला आहे".

"चित्रपट पुर्ण मनोरंजन करणारा आहे, दोघांनीही कमाल केली आहे."

तर हा सिनेमा यंदाचा सुपरहिट सिनेमा ठरणार असंही अनेकांनी लिहिलयं.

तर दुसऱ्याने लिहिलयं, "संपूर्ण टीमला त्यांच्या यशासाठी, बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरीसाठी शुभेच्छा!"

चाहते सामंथा आणि विजय देवरकोंडा यांच्या चित्रपटावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VHP Garba Ban : गरब्यात मुस्लिमांना बंदी घालण्याच्या विश्व हिंदू परिषदेच्या मागणीला केंद्रीय मंत्र्यांचा विरोध; संविधानाचा दिला दाखला

'बोक्या सातबंडे' चित्रपटात पेपर विकणाऱ्या अभिनेत्याला ओळखलंत का? आज मराठीसोबतच बॉलिवूडही गाजवतोय, कोण आहे हा?

Marathi News Live Updates : काँग्रेस नेते दिग्विजय सिंह उज्जैन ते अयोध्या पदयात्रा काढणार

Nanded News : नवसंशोधनाला मिळणार नांदेडची प्रयोगभूमी; ग्रामीण टेक्निकल कॅम्पसकडे ‘आविष्कार २०२६’ची धुरा!

Ambad News : तलावात खांदेमळणीला गाय, बैल धूण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय सौरभ नरोडेचा पाण्यात बुडून मृत्यू; धनगरपिंपरीसह परिसरात हळहळ व्यक्त

SCROLL FOR NEXT