Aashka Goradia Pregnant, Aashka Goradia news, Aashka Goradia Pregnancy, mothers day, mothers day 2023 SAKAL
मनोरंजन

Aashka Goradia Pregnant: मदर्स डेच्या दिवशीच बाळाची चाहूल, 'कुसुम' फेम आशका गोराडिया होणार आई

अशातच मदर्स डेला आशकाला ही गुड न्यूज मिळाल्याने तिच्या आनंदाला उधाण आलंय

Devendra Jadhav

Aashka Goradia Pregnant News: आज मदर्स डे. आईपण साजरा करण्याचा खास दिवस. मदर्स डे निमित्ताने एका अभिनेत्रीला आई होण्याचं सुख मिळालं आहे. ही अभिनेत्री म्हणजे कुसुम फेम अभिनेत्री आशका गोराडिया.

आशका लग्नानंतर ६ वर्षांनी आई होणार आहे. अशातच मदर्स डेला आशकाला ही गुड न्यूज मिळाल्याने तिच्या आनंदाला उधाण आलंय.

(kusum fame actress Aashka Goradia announces pregnancy with husband Brent Goble on Mother's Day)

एकता कपूरच्या 'कुसुम' या मालिकेत आशका गोराडिया कुमुदच्या भूमिकेत झळकली होती. 'मदर्स डे'च्या निमित्ताने तिने आपल्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने दिली आहे.

37 वर्षीय अभिनेत्री पती ब्रेंट ग्लोबसोबत तिच्या पहिल्या मुलाची अपेक्षा करत आहे. आशकाने गर्भधारणा तसेच प्रसूतीचा महिना सांगितला आहे.

आशका गोराडिया आणि ब्रेंट ग्लोब यांनी 1 डिसेंबर 2017 रोजी लग्न केले. आता लग्नाच्या 6 वर्षांनंतर हे जोडपे आई-वडील होण्यासाठी तयार आहे. 14 मे 2023 रोजी आशकाने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर प्रेग्नन्सीची घोषणा पोस्ट केली.

तिने एक अॅनिमेटेड व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये समुद्रकिनारा आणि चप्पल दिसत आहेत.

त्यावर लिहिले होते, 'बीच बेबी ऑन द वे'. आम्ही नोव्हेंबर 2023 मध्ये येणार्‍या सर्वात मोठ्या भेटीची वाट पाहत आहोत. आम्हाला तुमचे प्रेम द्या.. अशी पोस्ट आशका गोराडिया आणि ब्रेंट ग्लोब यांनी केलीय.

या व्हिडिओसोबत अभिनेत्रीने कॅप्शनही लिहिले आहे- हा मदर्स डे आणखी खास झालाय! या नोव्हेंबरमध्ये आमचे कुटुंब आणि आमची एक वेगळी प्रॅक्टिस होईल.

आम्ही आमच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या प्रवासाला सुरुवात करत असताना तुमचे प्रेमळ संदेश आम्हाला पाठवा!" बीच बेबी मार्गावर आहे! #parentstobe.

यापूर्वी बॉलिवूड लाईफला दिलेल्या मुलाखतीत आशकाने मातृत्वाबद्दल सांगितले होते. अभिनेत्रीने सांगितले होते की, तिच्या लग्नाला एक वर्ष झाले आहे आणि तिला हे आयुष्य मोकळेपणाने जगायचे आहे आणि आई-वडील बनून त्याचा आनंद घ्यायचा आहे. हा काळ आपला सर्वात आनंदी काळ असल्याचे वर्णन दोघांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Changur Baba : अंगठ्या अन् रत्न विकायचा, ५ वर्षात जमवली १०० कोटींची माया; धर्मांतर रॅकेट प्रकरणी अटक केलेला छांगुर बाबा कोण?

बौद्ध धर्मगुरू दलाई लामांना 'भारतरत्न' देण्याची मागणी; 80 खासदारांनी केली पाठिंबा दर्शवणारी स्वाक्षरी, मोदी सरकार घेणार लवकरच निर्णय?

Guru Purnima 2025 Greeting Card: गुरुपौर्णिमेनिमित्त गुरूंसाठी बनवा खास ग्रीटिंग कार्ड, जाणून घ्या सोपी पद्धत

Oxford Graduate: ऑक्सफर्ड विद्यापीठाचा पदवीधर करतोय फूड डिलिव्हरी; दरमहा कमावतोय लाखो रुपये, म्हणाला...

Solapur Crime: निर्दयी मुलाने बापाला चाबकाचे फटके देऊन संपविले, घरात रक्ताचा पाट वाहिला तरी...सोलापूर हादरले !

SCROLL FOR NEXT