LA model Maleesa Mooney’s body found in fridge, her ankles and wrists bound SAKAL
मनोरंजन

Maleesa Mooneys: दोन महिन्यांच्या गर्भवती अमेरिकन मॉडेलची निघृण हत्या, फ्रीजमध्ये सापडला मृतदेह

अमेरिकन मॉडेलची निघृण हत्या झाल्याचं समोर आलंय

Devendra Jadhav

Maleesa Mooneys Death News: मनोरंजन विश्वातुन धक्कादायक बातमी उघडकीस आलीय. गर्भवती लॉस एंजेलिस मॉडेल मलेसा मेरी मूनीच्या रहस्यमयी आणि निघृण मृत्यु झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मलेसा तिच्या राहत्या घरी रेफ्रिजरेटरमध्ये बांधलेल्या अवस्थेत आढळुन आली. आणि दुर्देव म्हणजे, ती दोन महिन्यांची गर्भवती होती.

(LA model Maleesa Mooney’s body found in fridge, her ankles and wrists bound)

मृत्युसमयी मलेसा मूनी दोन महिन्यांची गर्भवती

31 वर्षीय मॉडेलचा मृतदेह तिच्या डाउनटाउन लॉस एंजेलिस अपार्टमेंटमध्ये रेफ्रिजरेटरमध्ये आढळून आला. सप्टेंबर महिन्यात तिच्या आईने तपासणीची विनंती केल्यानंतर अधिकारी मलेसाच्या अपार्टमेंटला भेट देण्यासाठी गेले. तेव्हा ही गोष्ट उघडकीस आली.

हत्येप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. तिच्या निधनानंतर, मलेसाची बहीण जॉर्डिन पॉलीन हिने मलेसा दोन महिन्यांची गर्भवती असल्याचे उघड केले. (Latest Entertainment News)

हात - पाय बांधलेल्या अवस्थेत आढळली

पोलिसांनी तपास केल्यावर उघड झाले की, मलेसाचे संपूर्ण शरीर रक्ताने माखले होते, तोंड बंद होते, हात-पाय बांधलेले होते. यावरून मॉडेलची निर्घृण हत्या झाल्याचे स्पष्ट होते.

मात्र, आरोपी कोण याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पोलिस त्यांच्या सोशल मीडियावरून सतत पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत. याशिवाय मलेसाचे कोणाशी संबंध होते, याचाही तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे शिर उडवण्याचा प्रयत्न; एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT