laal singh chaddha movie kahani song composed at amir khan's hill station house in pachgani sakal
मनोरंजन

laal singh chaddha : 'या' खास ठिकाणी झाला 'कहाणी' गाण्याचा जन्म.. आमिर खान म्हणाला..

बॉलीवूड अभिनेता आमिर खान याच्या 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटाचे 'कहाणी' हे गाणे स्टुडिओत नाही तर पाचगणी येथील 'या' खास जागेत तयार करण्यात आले आहे.

नीलेश अडसूळ

Bollywood news : बॉलीवूड अभिनेता आमिर खान (aamir khan) याने आजवर अनेक दर्जेदार चित्रपट दिले. त्याचा प्रत्येक चित्रपट आशय-विषय आणि रंजकतेने भरलेला असतो. बऱ्याचदा सामाजिक भान जपण्याचा प्रयत्न तो चित्रपटातून करत आला आहे. सध्या चर्चा आहे ती त्याच्या 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटाची. हा चित्रपट ऑगस्टमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटासाठी आमिरने विशेष मेहनत घेतली आहे. 'लाल सिंग चड्ढा'चे 'कहाणी' हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले. या गाण्याला चाहत्यांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे.

'कहाणी' हे गाणे नुकतेच रेडिओ वरून प्रदर्शित करण्यात आले. अत्यंत तरल आणि भावस्पर्शी असे हे गीत आहे. यावेळी एक पॉडकास्ट सेशनही करण्यात आले. या पॉडकास्टला आमीर सोबत हे गाणे ज्यांनी बनवले ते प्रीतम आणि अमिताभ भट्टाचार्य ही उपस्थित होते. गाण्याच्या रिलीज नंतर गाण्यावर चर्चा देखील करण्यात आली.

पॉडकास्ट दरम्यान आमिरने एक महत्वाची बाब उघड केली. या गाण्याची निर्मिती आमिरच्या घरात झाल्याचे तो म्हणाला. गाण्याच्या निर्मितीवर काम करण्यासाठी आमिरसह त्याची संपूर्ण टीम पाचगणीला गेले. पाचगणी येथे आमिर आणि किरण या दोघांचे घर आहे. पाचगणी सारख्या निसर्गरम्य आणि थंड हवेच्या ठिकाणी त्यांचे हे घर आहे.

'कहाणी या गाण्यावर काम करण्यासाठी आम्ही पाचगणीला गेला. किरण राव (kiran rao) आणि माझे पाचगणीमध्ये (pachgani) एक घर आहे. त्यामुळे गाणं तयार करण्यासाठी आम्ही ती जागा निवडली. बऱ्याचदा आम्ही रिहर्सलसाठीही तिथे जातो. त्या ठिकाणी सृजनात्मक काम खूप चांगल्या पद्धतीने होते. एखाद्या कल्पक गोष्टीला घडवणारी ही जागा आहे. (hill station) आमच्या घरातील एका खोलीत अमिताभ आणि प्रीतम यांनी स्वतःला कोंडून घेतले होते आणि आम्हाला बाहेर केवळ वादनाचा आवाज ऐकू येत होता. जेव्हा ते गाण्यावर काम करत होते तेव्हा आम्ही बाहेर बागेत बसून संवाद, वेशभूषा आणि इतर काही गोष्टींवर चर्चा करायचो."असे आमिर म्हणाला.

ही जागा आमिर साठी अत्यंत खास आहे. तो बऱ्याचदा तणावातून बाहेर येण्यासाठी, किंवा काहीतरी नवीन करण्यासाठी या जागेवर आवर्जून येतो. त्याच्याया घराविषयी त्याने अनेकदा सांगितले आहे. पॉडकास्टमध्ये आमिरने आणखी एक मोठी माहिती दिली. 'लाल सिंग चड्ढा' (laal sing chaddha)चा रिमेक करावा अशी १४ वर्षांपासून इच्छा होती. पण चित्रपटाचे हक्क मिळण्यास बराच वेळ लागला.' असे तो म्हणाला. लाल सिंग चड्ढा हा 'टॉम हँक्स' यांच्या पुरस्कार-विजेत्या 'फॉरेस्ट गंप' या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT