Laapataa Ladies Kiran Rao Movie  
मनोरंजन

Laapataa Ladies Review : चक्क करण जोहरनं किरण रावच्या 'लापता लेडिज'चा केला रिव्ह्यू! 'हा चित्रपट म्हणजे...'

प्रख्यात दिग्दर्शक निर्माता करण जोहरनं आता किरण रावच्या लापता लेडिज (Laapataa Ladies Review) चित्रपटाचा रिव्ह्यू केला आहे.

युगंधर ताजणे

Laapataa Ladies Movie Review : सध्या जिकडे तिकडे आमिर खानची निर्मिती आणि किरण रावचे दिग्दर्शन असलेल्या लापता लेडिज या चित्रपटाची चर्चा होताना दिसत आहे. किरणनं (Aamir Khan News) अकरा वर्षानंतर पुन्हा दमदार कमबॅक केलं असून तिच्या या चित्रपटाचा (Kiran Rao Movie) रिव्ह्यू चक्क प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरनं केला आहे.

करणनं त्याच्या इंस्टा अकाउंटवरुन किरण रावच्या लापता लेडिजचं (Karan Johar Reviews Kiran Rao Directorial Laapataa Ladies ) कौतुक केलं आहे. त्यानं म्हटलं आहे की, किरण राव आणि आमीर खानची ही फिल्म खूपच जबरदस्त आहे. ही या वर्षीची सर्वोत्कृष्ट फिल्म आहे. असे मी दाव्यानं सांगू शकतो. जेव्हा तुम्ही २०२४ च्या शेवटी वर्षभरातील सर्वोत्तम चित्रपटांकडे पाहाल तेव्हा तुम्हाला या चित्रपटाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

करणनं केला कौतुकाचा वर्षाव...

करण म्हणतो की, किरणनं खूपच सहजगत्या या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.त्यासाठी तिचे अभिनंदन करायला हवे. या चित्रपटामध्ये कॉमेडी आहे, इमोशनल टच आहे आणि एक सोशल मेसेजही आहे. ज्यामुळे प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन तर होतेच याशिवाय त्यांना एक आपण वेगळी कलाकृती पाहिल्याचा आनंदही होतो. निर्माता आणि दिग्दर्शक यांच्या मेहनतीसाठी कौतुक करायला हवे.

मला तर प्रेक्षकांना सांगायचे आहे की, तुम्ही या आठवड्यात बाकी काहीही प्लॅन करत असाल पण किरण रावचा हा चित्रपट चुकवू नका. हा चित्रपट तुमची निराशा करणार नाही एवढं मात्र नक्की. किरण राव आणि आमिर खानच्या टीमचे खूप खूप अभिनंदन.

लापता लेडिजचा विषय आहे तरी काय?

प्रसिद्ध दिग्दर्शिका किरण राव यांचा लापता लेडिज हा एक कॉमेडी ड्रामा आहे. ज्याची निर्मिती आमिर खान आणि किडलिंग प्रॉडक्शननं केली आहे. ही फिल्म विप्लव गोस्वामी यांच्या कथेवर आधारित आहे. लापता लेडिजची कथा आणि संवाद स्नेहा देसाई आणि दिव्यनिधी शर्मा यांनी लिहिले आहेत. जियो स्टुडिओजसह आमिर खान आणि ज्योति देशपांडे हे मेकर्सच्या भूमिकेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

केकेआरचे १८ कोटी पाण्यात? दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज मैदानाबाहेर, चाहत्यांची वाढली धडधड, नेमकं काय घडलं ?

आज संपतोय Amazon Summer Sale, फक्त 99 रुपयांपासून मिळतायत वस्तू..सर्व ऑफर्स पाहा एका क्लिकवर

"आम्ही एकत्र सिनेमा बघायला जाणार होतो त्यापूर्वीच" राजा शिवाजी फेम अभिनेत्रीला पितृशोक; म्हणाली..

SCROLL FOR NEXT