Kiran Rao Laapataa Ladies Movie
Kiran Rao Laapataa Ladies Movie esakal
मनोरंजन

Laaptaa Ladies Review : 'बायको हरवली म्हणून कुणी...' किरण रावचा 'लापता लेडिज' नेमकं काय सांगू पाहतोय?

युगंधर ताजणे

Laapataa Ladies movie review: जगणं जेवढं वाढतं तेवढं सोपं नाही. खूप छोट्या मोठ्या प्रसंगातून माणसाला धडे मिळतात. ते गिरवत तो आपलं विश्व तयार करतो. यात बऱ्याचदा त्याच्या अंगी असलेल्या विनोदाच्या साह्यानं त्याला थोडाफार मानसिक आधार मिळतो. पण (Laapataa Ladies movie review news) जगण्यातील विनोद हरवला तर येणाऱ्या प्रसंगांना सामोरं जाण्याचं धाडसं म्हणावं तितकं अंगी बाणवता येत नाही. असं काहीसं किरण रावचा लापता लेडिज सांगतो. सध्या हा चित्रपट प्रेक्षकांच्या चर्चेचा अन् कौतुकाचा विषय आहे.

बऱ्याच दिवसांपासून किरण रावच्या लापता लेडिजची चर्चा रंगली होती. (Kiran Rao Movie) अखेर तो चाहत्यांच्या भेटीला आला आहे. सोशल मीडियावरुन नेटकऱ्यांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे. आगळ्या वेगळ्या विषयाचा आणि खुमासदार, रंगतदार मांडणीच्या या चित्रपटानं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत.

स्टोरी आहे तरी काय? (Laapataa Ladies Movie Story)

लापता लेडिज चित्रपटाची सुरुवात सूरजमुखी नावाच्या एका गावापासून सुरु होते. त्या गावात राहणारा दीपक (स्पर्श श्रीवास्तव) ज्याचं नुकतचं (Sparsha Shrivastava) लग्न झालं आहे आणि तो त्याची पत्नी फूल (नितांशी गोयल) सोबत पहिल्यांदाच सासरी निघाला आहे. मात्र या दरम्यान जे घडतं त्यामुळे फूलकडून चूकीनं ती ट्रेन सुटते आणि तिथुनच चित्रपटाला सुरुवात होते. याचवेळी दीपक फूल समजून दुसरीलाच घरी घेऊन येतो. यानंतर जो गोंधळ उडतो त्यासाठी हा चित्रपट एकदा पाहावाच.

लापता लेडिज हा विनोदी ढंगाचा चित्रपट आहे. दिग्दर्शक किरण रावनं मोठ्या प्रभावीपणे अनेक गोष्टींची पेरणी केली आहे. ज्यातून जाणकार (Latest Bollywood Movies) प्रेक्षकांना सामाजिक, राजकीय संदेश मिळतो. किरणला जे सांगायचं आहे ते तिनं त्या फ्रेम्समधून अचूकपणे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. गाव, गावाकडची माणसं, परंपरा, रितीभाती, हे सारं तिनं कॅमेऱ्याच्या माध्यमातून वेगळ्या अँगनं टिपण्याचा प्रयत्न केला आहे.

नव्या कलाकारांनी संधीचं केलं सोनं....

कलाकारांच्या भूमिकेविषयी बोलायचं झाल्यास किरण रावनं ज्या (Kiran Rao Movie Director) कलाकारांना लापता लेडिजमध्ये संधी दिली आहे त्यांनी त्याचे सोनं केलं आहे. सगळे नवोदित कलाकार आहेत. त्यांनी यापूर्वी काही मालिकांमध्ये भूमिका केल्या आहेत. त्यामुळे कलाकारांकडून या चित्रपटासाठी पूर्णपणे योगदान देण्यात आल्याचे दिसते. प्रेक्षकांना शंभर टक्के मनोरंजन देण्यात आणि त्यांना हसवण्यात कलाकार कुठेही कमी पडले नाहीत.

किरण रावनं अकरा वर्षानंतर दमदारपणे कमबॅक करत पुन्हा एकदा आपल्या नावाची वेगळी ओळख दाखवून दिली आहे. तिच्यावर चाहत्यांनी, प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. या चित्रपटामध्ये स्पर्श श्रीवास्तव, नितांशी गोयल आणि प्रतिभा रांटाने ज्या भूमिका केल्या आहेत त्याला तोड नाही. त्यांनी मोठ्या प्रभावीपणे आपल्या भूमिकांना न्याय देत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

स्पर्शनं दीपकची केलेली भूमिका जबरदस्त आहे. प्रेमात आकंठ बुडालेला दीपक, आपली पत्नी हरवल्यानंतर अस्वस्थ झालेला दीपक या भूमिका त्यानं प्रभावीपणे साकारल्या आहेत. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी त्याचे कौतुक केले आहे. त्याचे एक्सप्रेशन्स हे खूप काही सांगून जाणारे आहेत. अशा प्रतिक्रिया त्याला मिळताना दिसत आहेत.

दोन्ही अभिनेत्रींनी केली कमाल...

लापता लेडिजमध्ये मुख्य भूमिकेत असणाऱ्या नितांशी गोयलनं चाहत्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले आहे. तिनं फूलची भूमिका साकारली आहे. दुसरी वधू पुष्पा राणीची भूमिका प्रतिभा रांटानं केली आहे. या दोन्ही अभिनेत्रींनी आपल्या भूमिकांना न्याय देत प्रेक्षकांना जिंकून घेतले आहे. त्यामुळे रविकिशन वगळता अन्य कुणी मोठा कलाकार नसतानाही हा चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवतो यात शंका नाही.

रविकिशन म्हटल्यावर काय बोलायचं...(Ravi Kishan Role)

या चित्रपटामध्ये सर्वाधिक महत्वाची भूमिका आहे ती पोलीस अधिकारी श्याम मनोहरची. ती साकारली आहे प्रसिद्ध अभिनेता रवि किशननं. रवि किशननं यापूर्वी देखील बॉलीवूडमधील अनेक चित्रपटांमधून आपली वेगळी ओळख दाखवून दिली आहे. तो एक प्रतिभावंत अभिनेता आहे हे त्यानं लापता लेडिजमधून सांगितलं आहे. अशी कोणती भूमिका नाही की जी रवि किशननं साकारली नाही. लापता लेडिजमध्ये महत्वाचं आकर्षण रवि किशन यांची भूमिका आहे हे काही वेगळं सांगायला नको.

श्याम मनोहर शिवाय पंचायत फेम बनराकस अर्थात दुर्गेश कुमारनं देखील चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. याशिवाय मराठी अभिनेत्री छाया कदमची भूमिकाही चमकदार आहे. त्यांनी आपल्या भूमिकेतून प्रेक्षकांना आगळी वेगळी ट्रीट दिल्याचे दिसते. तिच्या वाट्याला जे काही प्रसंग आले आहेत त्यात तिनं आपली वेगळी छाप उमटवली आहे.

------------------------------------------------------------------

चित्रपटाचे नाव - लापता लेडिज

दिग्दर्शक - किरण राव

कलाकार - स्पर्श श्रीवास्तव, नितांशी गोयल, प्रतिभा रांटा, रवि किशन

रेटिंग - ४ स्टार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: डोंबिवलीत ईव्हीएम मशीन पडले बंद

IPL 2024 Playoffs : प्लेऑफसाठी नाही कोणत्या राखीव दिवस; पावसामुळे खेळखंडोबा झाला तर कसा लागणार निकाल?

आठवेळा मतदान करणारा अल्पवयीन तरुण ताब्यात, पुन्हा होणार मतदान; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Hapus Season : कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात;उष्ण हवामानामुळे आवक घटली, हंगाम १५ दिवस आधीच संपणार

SCROLL FOR NEXT