Cinematographer Gururaj Jois Passes Away:  Esakal
मनोरंजन

Gururaj Jois Passes Away: सिनेमॅटोग्राफर गुरुराज जोइस यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन! 'लगान' चित्रपटातील काम अविस्मरणीय

जोइस यांचे 27 नोव्हेंबर रोजी बेंगळुरू येथे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले

Vaishali Patil

Cinematographer Gururaj Jois Passes Away: मनोरंजन विश्वातून एक वाईट बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर गुरुराज जोइस यांचे निधन झाले आहे. 27 नोव्हेंबर रोजी बेंगळुरू येथे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. वयाच्या 53 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मूल असा परिवार आहे.

आमिर खानच्या 'लगान' या चित्रपटासह अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण योगदानसाठी सिनेमॅटोग्राफर गुरुराज जोइस ओळखले जायचे.

गुरुराज यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक लोकप्रिय बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले. त्यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे तर मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी सर्वजण प्रार्थना करत आहेत.

जोईस यांनी सहाय्यक सिनेमॅटोग्राफर म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये सिनेमॅटोग्राफर म्हणून काम केले. इतक्या कमी वयात त्यांनी जगाचा निरोप घेतला.

गुरुराज यांनी मुंबई से आया मेरा दोस्त, शूटआउट अॅट लोखंडवाला, मिशन इस्तंबूल, एक अजनबी, जंजीर आणि गली गली चोर है या चित्रपटांमध्ये सिनेमॅटोग्राफर म्हणून काम केले होते.

आमिर खानच्या लगान या चित्रपटासाठी त्यांना ओळखले जायचे. आमिर खान प्रॉडक्शनने आपल्या एक्स अकाउंटवर पोस्ट शेयर करत लिहिले की, गुरुराज जोईस यांच्या निधनाच्या वृत्ताने आम्हाला खूप दुःख झाले. कॅमेर्‍यामागील कामामुळे त्यांनी 'लगान'ला जिवंत केले. तुमच्या आत्म्याला शांती लाभो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL २०२६ शेड्यूल कधी जाहीर होणार? तारीख आली समोर; BCCI सचिवांनी मोठा ट्विस्टही सांगितला!

Mutual Fund: फेब्रुवारीत गुंतवणूकदारांचा बदलला मूड! कोणत्या फंडांमध्ये वाढली गुंतवणूक? गोल्ड ETF गुंतवणुकीत मोठा बदल

Kannad News : कन्नडमध्ये अखेर युतीचं सुत जुळलं; सुप्रिया घुगे सभापती तर माया सुराशे उपसभापती

Horoscope : मिथुन राशीत गुरु मार्गी गोचर; 11 मार्चपासून धनुसह 'या' 5 राशींसाठी शुभलाभ संयोग, धनलाभ, कामात यश अन् जीवनात मोठा बदल

मोठी बातमी : T20 World Cup विजेत्या भारतीय खेळाडूवर आयसीसीची दंडात्मक कारवाई! 'ती' चूक महागात पडली

SCROLL FOR NEXT