Nitish Chavan Instagram
मनोरंजन

'आमच्या जीवाला धोकाय'; 'लागीरं झालं जी' फेम नितीश चव्हाणची पोस्ट

घरच्यांचा विरोध असल्यामुळे आम्हाला हे पाउल उचलायला लागलं, असं त्याने लिहिलं आहे.

स्वाती वेमूल

'लागीरं झालं जी' (Lagira Zhala Ji) या मालिकेत अज्याची भूमिका साकारलेला अभिनेता नितीश चव्हाण (Nitish Chavan) सध्या त्याच्या सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे चर्चेत आला आहे. 'आमच्या जीवाला धोकाय' असं त्याने या पोस्टमध्ये लिहिलंय. नितेशची ही पोस्ट पाहून चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. नेमकं काय झालंय, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. या पोस्टसोबत नितेशने स्वत:चा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये तो हातात एक फलक घेऊन उभा आहे. 'आम्ही पळून जाऊन लग्न केलंय. आमच्या जीवाला धोकाय' असं या फलकावर लिहिलेलं आहे. ही पोस्ट पाहून चाहत्यांना धक्का बसला आहे.

'मी आतापर्यंत सोशल मीडियावर माझ्या रिलेशनबद्दल सांगितलं नाही. कारण घरच्यांचा विरोध होता आणि अजूनही आहे. त्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला आहे. कालच आम्ही पळून जाऊन लग्न केलंय, मला खरंतर हे असं सगळ्यांसमोर सांगायचं नव्हतं. पण कालपासून तिच्या घरून मला वारंवार धमक्या येत आहेत, म्हणून हे सांगावं लागतंय,' असं नितीशने लिहिलंय. या पोस्टमध्ये त्याने मानसी भावलकर हिला टॅग केलंय.

मानसीनेही तिच्या अकाऊंटवर अशीच पोस्ट केली आहे. 'आम्ही पळून लग्न केलंय. घरच्यांचा विरोध असल्यामुळे आम्हाला हे पाऊल उचलायला लागलं. आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे,' असं तिने लिहिलं आहे. या दोघांच्या पोस्टवर विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. काहींनी याला प्रमोशनचा फंडा म्हटलंय. तर काहींनी दोघांविषयी चिंता व्यक्त केली आहे. आता हे नेमकं काय प्रकरण आहे, याबाबत नितीश आणि मानसीच नेटकऱ्यांना सांगू शकतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lindsey Graham Death : डोनाल्ड ट्रम्प यांच्या विश्वासू खासदाराचे निधन, भारताला दिली होती ५०० टक्के टॅरिफची धमकी

Sangli Weather Forecast Next 5 Days : कोयना, चांदोली धरण क्षेत्रात पावसाची विश्रांती! 24 ते 25 जुलैनंतर मॉन्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता, पाहा हवामान अंदाज

Latest Marathi News Update : अयोध्येतील राम मंदिरातील दान चोरीने जगभरातील रामभक्तांच्या भावना दुखावल्या- केजरीवाल

Thane DCC Bank : ठाणे जिल्हा बँकेवर भाजप-शिवसेना महायुतीचा झेंडा! रवींद्र चव्हाण-एकनाथ शिंदेंच्या 'चाणक्यनीती'मुळे बविआचा गेम ओव्हर, नवे अध्यक्ष कोण?

Deccan Queen Heritage Coach : मुंबई-पुणे 'डेक्कन क्वीन' नव्या हेरिटेज लूकमध्ये; चहा, नाष्टा, डायनिंग ट्रेनचा अनुभव खतरनाक

SCROLL FOR NEXT