lagna kallol marathi movie teaser mayuri deshmukh siddharth jadhav bhushan pradhan  SAKAL
मनोरंजन

Lagna Kallol Teaser: मांडव सजला दारी अन्.. सिद्धार्थ जाधवच्या 'लग्नकल्लोळ'चा धम्माल टिझर रिलीज

'लग्नकल्लोळ' सिनेमाचा धम्माल टिझर रिलीज झालाय

Devendra Jadhav

Lagna Kallol Teaser News: मयुरी देशमुख, सिद्धार्थ जाधव आणि भूषण प्रधानयांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘लग्नकल्लोळ’ या चित्रपटाचा जबरदस्त टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. टिझर पाहून प्रेक्षक या धमाकेदार चित्रपटाची आतुरतेने वाट पाहाणार, हे नक्की!

या चित्रपटाच्या टिझरला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिलीय. त्यामुळे लग्नकल्लोळ सुपरहिट होणार यात शंका नाही.

टिझरमध्ये सिद्धार्थ सोबत मयुरी लग्नमंडपात दिसत आहे तर दुसऱ्या क्षणी भूषण मयुरीला लग्नाची मागणी घालताना दिसत आहे. यावरून मयुरी नक्की कोणासोबत लग्न करणार आणि हा काय ‘लग्नकल्लोळ’ सुरू आहे, याचे उत्तर प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावरच मिळणार आहे. चित्रपटात या प्रमुख कलाकारांसोबत अनेक दमदार कलाकार आहेत. हा लग्नाचा धमाका १ मार्चला उडणार आहे.

मयुर तिरमखे फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे, आण्णासाहेब रामचंद्र तिरमखे, मंगल आण्णासाहेब तिरमखे, डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे निर्माते आहेत. तर मोहम्मद एस. बर्मावाला आणि डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे दिग्दर्शित 'लग्न कल्लोळ' या चित्रपटाचे लेखन जितेंद्रकुमार परमार यांनी केले आहे.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक, मोहम्मद बर्मावाला म्हणतात, " चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. लग्न म्हटले की घरात कल्लोळ हा आलाच. परंतु हा कल्लोळ जरा वेगळा आहे. यात ट्विस्ट आहे. हा कौटुंबिक चित्रपट असून प्रेक्षकांसाठी निखळ मनोरंजनाचा खजिना आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Viral Video: मुसळधार पावसातही लोकल सुस्साट, पश्चिम रेल्वेने शेअर केला व्हिडिओ; लोक म्हणाले- हेच मुंबईचे स्पिरिट !

Asia Cup 2025 आधीच इशान किशनला धक्का! टीम इंडियात निवड होणं झालं आणखी कठीण

Mumbai Heavy Rain : अंधेरीत ४ फूट पाणी, सबवे ३ तासांपासून बंद; गटाराचं झाकण तुटलं, पावसाने नागरिकांचे हाल

Dmart Thefts: खरेदी कमी, चोरी जास्त, डीमार्टमध्ये सर्वात जास्त चोरी कोणत्या वस्तूंची होते?

Video: 'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटने पुन्हा दिला 'तो' सीन; अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT