lalbaugcha raja 2023 all people missed nitin chandrakant desai last design by art director  SAKAL
मनोरंजन

Lalbaugcha Raja 2023: यंदा समस्त लालबागकरांना नितीन देसाईंची आठवण आल्याशिवाय राहणार नाही

लालबागच्या राजाची आरास ही नितीन देसाईंची शेवटची कलाकृती

Devendra Jadhav

Nitin Desai News: काही दिवसांपुर्वी कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी स्वतःचं आयुष्य संपवलं. नितीन देसाईंच्या अकस्मात निधनाने सर्वांना धक्का बसला. नितीन देसाई यांनी गेली अनेक वर्ष लालबागच्या राजाची आरास केली.

लालबागचा राजाची जेव्हा ७५ वर्ष पूर्ण झाली होती, म्हणजेच अमृत महोत्सवी वर्ष होतं तेव्हा नितीन देसाई केलेला भव्यदिव्य देखावा सर्वांच्या अजुनही लक्षात आहे. लालबागच्या राजाच्या प्रवेशद्वाराजवळ भव्य हत्ती होते.

यंदा मात्र लालबागच्या राजाचे सर्व पदाधिकारी, लालबागमध्ये राहणारे सर्व रहिवासी नितीन देसाईंची आठवण काढल्याशिवाय राहणार नाहीत.

(lalbaugcha raja 2023 all people missed nitin chandrakant desai)

लालबागचा राजा हे मुंबईतील सर्वात लोकप्रिय गणपती मंडळांपैकी एक आहे. दरवर्षी लाखो भाविक लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी येत असतात.

इतकंच नव्हे तर अनेक सेलिब्रेटी आणि राजकारणी देखील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भेट देतात. यावर्षी, कला दिग्दर्शक नितिन चंद्रकांत देसाई यांच्या संकल्पनेतुन सजावट उभी राहिली पण ती पहायला देसाई आज या जगात नाहीत.

नितीन देसाई यांनी मृत्यूच्या काही दिवस आधी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे त्यांनी दिलेला शब्द पूर्ण केला. याशिवाय लालबाग राजाचे पाद्यपूजन आणि मंडप पूजनाची जबाबदारी त्यांनी पूर्ण केली.

मंडप आणि मंडपाच्या आराखड्याची अनेक छायाचित्रे शेअर करत त्यांनी लिहिले, "लालबागच्या राजाचा विजय होवो. लालबागच्या राजाच्या 90 व्या वर्षी श्री गणेशाची मंडप पूजा आणि सजावट आज पूर्ण झाली. गणपती बाप्पा मोरया." अशी पोस्ट नितीन देसाई यांनी लिहीली होती.

यंदा लालबागचा राजा पाहायला पुन्हा एकदा महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातुन लोकं येतील. राजाच्या दर्शनासाठी गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवसापासुन भाविक भक्त रांगेत दर्शनासाठी उभे असतील.

गणरायाचं रुप डोळ्यात साठवून ठेवत असतानाच अनेकांच्या मनात लालबाग राजाच्या भोवती असलेली सुंदर आरास नजरेत येईल. पण ही आरास ज्याने घडवली तो अवलिया कलाकार नितीन देसाई मात्र नाही, ही खंत मनाला लागून राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 1,500 अंकांनी खाली; कारण काय? कोणत्या शेअर्सला फटका?

Snake Bite Death : आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा हिरावला! नागाच्या दंशात दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत, जिन्यात खेळताना दबा धरून बसलेला साप

IPL 2026: राजस्थान एक्स्प्रेसला अधिक संधी सातत्याचा अभाव असलेल्या सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आज सामना, कशी असेल प्लेइंग-११

Kolhapur Fraud Case : कोल्हापुरात 'दामदुप्पट'च्या नावाखाली 3 कोटींचा गंडा; पुणे गाठून मास्टरमाईंड वैशाली गुरवला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, काय आहे श्रीमंता बाजार?

Latest Marathi News Live Update : एप्रिलच्या सुरुवातीलाच जलसाठा निम्म्यावर; पाणीटंचाईचा धोका वाढला

SCROLL FOR NEXT