Lalit Modi & Sushmita Broke Up esakal
मनोरंजन

Lalit Modi & Sushmita Brake Up : शुरू होते ही खतम? ललित मोदी-सुष्मिताचं ‘ब्रेकअप’

ललित मोदींनी बदलला इन्स्टाग्रान DP अन्...

सकाळ डिजिटल टीम

Lalit Modi & Sushmita Broke Up : IPL फाऊंडर ललित मोदीनं बेटर हाफ म्हणत शेअर केलेल्या सुष्मितासोबतच्या फोटोनंतर सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. या दोघांच्या लव अफेअरच्या नेटकऱ्यांमध्ये भन्नाट चर्चा रंगल्या होत्या. मात्र आता ललित मोदीने त्यांच्या सोशल मीडियावर केलेल्या एका बदलामुळे या दोघांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चांना उधाण आलंय.

ललित मोदीनं त्यांच्या इन्स्टा अकाऊंटवरून त्यांच्या बेटर हाफचा फोटो बदललाय. त्यामुळे या दोघांचं बिनसलं असल्याच्या जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. माहितीसाठी या ब्रेकअपच्या चर्चांना नेटकऱ्यांनी हवा दिली असून ललित मोदीने सुष्मिता सेनसोबतचा इन्स्टाग्राम प्रोफाईल बदलल्याने या चर्चा रंगल्या. सुरूवातील 'सुष्मितासोबत जीवनाची नवी सुरूवात झाली आहे, माय लव', असं लिहत ललित मोदींनी लांबलचक पोस्ट लिहीली होती. ती पोस्ट बघितल्यानंतर अनेकांनी जिथे या जोडप्याला ट्रोल केलं तिथे अनेकांनी या लव कपलचं कौतुकही केलं होतं. मात्र अचानक मोदींचं इन्स्टाग्राम प्रोफाईल बदललं आणि नेटकऱ्यांनी यांचं ब्रेकअप झालं असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर पसरवल्या आहेत.

ललित मोदीच्या सुष्मितासाठीच्या 'बेटर हाफ' पोस्टमध्ये टाकलेल्या रोमँटिक फोटोनंतर सोशल मीडियावर राडा झाला होता. तेव्हापासून या दोघांच्याही वयक्तिक आयुष्याकडेही नेटकऱ्यांचं बारीक लक्ष असतं. ललित मोदींचं इन्स्टा प्रोफाईल बदलताच आता अफेरच्या चर्चांना फुल स्टॉप लागत ललित आणि सुष्मिताच्या ब्रेकअप चर्चांना उधाण आलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : आता हिंदू माफ करणार नाही! राम मंदिर गैरव्यहार प्रकरणारून उद्धव ठाकरेंचा संताप, दादरमध्ये रामरक्षा आंदोलन...

farmer loan waiver: इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही; बारामतीत जयंती सोहळ्यात कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांची मोठी घोषणा, काय म्हणाले..

'त्याने सिगारेटने मांडीला चटके दिले, कानशिलातही मारली'; नीती टेलरचा धक्कादायक खुलासा, म्हणाली तो...

China Dumping: चीनच्या आणखी एका डावावर भारताचा प्रहार! शेतीत वापरल्या जाणाऱ्या औषधाच्या आयातीवर मोठा निर्णय, नवे नियम लागू

Pune Crime: पुण्यात मध्यरात्री थरार! ट्रक अडवून चालकाला मारहाण, ट्रक लुटण्याचा प्रयत्न फसला, अन् काय घडलं..

SCROLL FOR NEXT