lalita jadhav talks about farmer suicide in kon honar crorepati  sakal
मनोरंजन

पतीनं आत्महत्या केल्यानंतर..कोण होणार करोडपती'च्या मंचावर शेतकऱ्यांची व्यथा

जळगावच्या ललिता जाधव मांडणार शेतकर्‍यांच्या कुटुंबाची व्यथा!

नीलेश अडसूळ

kon honar crorepati : सोनी मराठी (sony marathi) वाहिनीवर 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाचे नवे पर्व सुरू झाले असून या पर्वाची चांगलीच हवा झाली आहे. वेगवेगळ्या परिस्थितीतून आलेले स्पर्धक आणि सेलेब्रिटी स्पर्धक यामुळे कार्यक्रम पाहताना प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन होत आहे. ज्ञान आणि मनोरंजनाच्या या खेळत येत्या आठवड्यात मात्र आपले डोळे पाणावणार आहेत. कारण जळगावच्या शेतकरी कुटुंबातील ललिता जाधव आपला खडतर आणि तितकाच प्रेरणादायी प्रवास या मंचावर उलगडणार आहेत. (lalita jadhav talks about farmer suicide in kon honar crorepati )

जळगावच्या ललिता जाधव 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत कारण त्यांना मुलांच्या शिक्षणासाठी पैसे साठवायचे आहेत. ललिता या अंगणवाडी शिक्षिका आहेत. या आधी त्या सेविका म्हणून काम करत. पण त्यांना स्वतःची प्रगती करायची होती. म्हणून त्यांनी लग्नानंतर अजून शिक्षण घ्यायचे ठरवले. परंतु घरची परिस्थिती बेताची असल्याने कधी ओवाळणीतून किंवा अजून कुठून जर पैसे भेट म्हणून मिळाले तर ते पैसे त्या जपून ठेवत आणि लागतील तसे ते पैसे शिक्षणासाठी वापरत. असे करून त्यांनी एम.ए. केले आणि त्या शिक्षिका झाल्या.

ललिता यांचे लग्न एका सर्वसाधारण शेतकरी कुटुंबात झाले. त्यामुळे सासरी देखील पैशाची अडचण कायम असायची. कधी हवामान साथ देत नाही तर कधी पिकाला हवा तो भाव मिळत नाही. म्हणून कायम हातात जेमतेम पैसा असे. या सगळ्या मुळे कर्ज घेण्याची वेळ आली पण आता ते कर्ज फेडणार कसे. फेडण्याचा काही मार्ग दिसला नाही म्हणून ललिता यांच्या पतीने कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली आणि ललिता आणि मुलांना सोडून निघून गेले. त्यानंतरचा खडतर प्रवास ललिता यांनी एकटीने केला. हाच त्यांचा प्रेरणादायी प्रवास 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमात त्या मांडणार आहेत. आपल्या मुलांच्या भविष्यासाठी त्या किती रक्कम जिंकतात हेही पाहण्यासारखे आहे. येत्या बुधवारी हा भाग प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Martyr constable pension case: हुतात्मा जवानाच्या आईला पेन्शन नाकारली! उच्च न्यायालयाने दिले महत्त्वाचे आदेश

Pune Crime : येरवड्यात दारू पिताना वाद, लाकडी दांडक्याने मित्राचा खून

Maha Shivratri 2026 Travel Tips: महाशिवरात्रीला महादेवाच्या प्रसिद्ध मंदिरांना भेट द्यायला जाताय? मग 'या' 5 गोष्टी नक्की लक्षात ठेवा

RBI Rule: महत्त्वाची बातमी! आता १००% सुरक्षित निधीच मान्य; असुरक्षित हमींना पूर्णविराम, ब्रोकर्ससाठी आरबीआयचे कडक नियम लागू

Maha Shivratri 2026: भगवान भोलेनाथांकडून जीवनातील 'या' 4 महत्त्वाच्या गोष्टी शिका, कधीच येणार नाही अपयश

SCROLL FOR NEXT