Lara Dutta Birthday special news miss universe to actress movies career lifestyle marriage husband  sakal
मनोरंजन

Lara Dutta Birthday: मिस युनिव्हर्स झाली आणि नशीब पालटलं.. असा आहे अभिनेत्री लारा दत्ताचा जीवनप्रवास..

अभिनेत्री लारा दत्ताचा आज वाढदिवस त्यानिमित्ताने ही खास पोस्ट..

नीलेश अडसूळ

बॉलीवुडमध्ये सध्या फारशी सक्रिय नसली तरी जिच्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते अशी अभिनेत्री म्हणजे लारा दत्ता. अभिनेत्री लारा दत्ता चित्रपट विश्वात आली अत्यंत कमी वेळात तिला मोठी प्रसिद्धी मिळाली. आपल्या दमदार अभिनयाने आणि अस्सल सौंदर्याने तिने चाहत्यांची मन जिंकली.

आज ती चित्रपटात दिसत नसली तरी तिचा चाहतावर्ग कमी झालेला नाही. आजही तिचे असंख्य चाहते आहेत. अशा लाराचा आज वाढदिवस. आज लारा आपला 45 वा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने तिला सर्वांनी शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

आज जरी लारा प्रसिद्धीच्या शिखरावर असली तरी हा प्रवास सोपा नव्हता. आज तिच्या वाढदिवासानिमित्त जाणून घेऊया तिचा मिस युनिव्हर्स ते बॉलीवुड हा थोडक्यात जीवनप्रवास..

(Lara Dutta Birthday special news miss universe to actress movies career lifestyle marriage husband )

अभिनेत्री लारा दत्ताचा (Lara Dutta) आतापर्यंतचा प्रवास अभिमानास्पद आहे. लाराने तिचे शालेय शिक्षण सेंट फ्रान्सिस झेविअर गर्ल्स हायस्कूल, बंगलोरमध्ये पूर्ण केले. त्यानंतर, लाराने मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्राची पदवी घेतली.

उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे 16 एप्रिल 1978 ला जन्मलेल्या लाराने आपल्या सौंदर्याने सातासमुद्रापार झेंडे रोवत 2000 मध्ये मिस युनिव्हर्स हा मानाचा किताब मिळवला होता. तिला मॉडेलिंगची आवड असल्याने तिने त्यातच करियर करायचे ठरवले आणि त्यात यशही मिळवले.

या नंतर लाराला बॉलीवुडचे दार खुले झाले. ‘अंदाज’ या चित्रपटातून 2003 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटासाठी लाराला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. तिच्या कामाचे ही कौतुक करण्यात आले होते.

लाराने 'पार्टनर', 'मस्ती','नो एंट्री', 'भागमभाग', 'हाउसफुल्ल', 'चलो दिल्ली' यासारख्या अनेक हिट सिनेमांत काम केले. हे सिनेमे करत असताना लारा मॉडेलिंगही करत होती. याच काळात लाराची भेट भारताचा टेनिसपटू महेश भूपतीशी झाली.

हे दोघं जेव्हा भेटायला लागले तेव्हा महेश आधीच विवाहीत होता. महेशने सात वर्षांच्या त्याच्या लग्नाला फुलस्टॉप देत २०११ मध्ये लाराशी लग्न केले. या दोघांना एक मुलगी असून तिचे नाव सायरा असे आहे.

मागील वर्षी रिलीज झालेल्या ‘बेलबॉटम’ चित्रपटात लाराने दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची प्रमुख भूमिका साकारली होती. त्यानंतर लारा 'हिकप्स अँड हुकअप्स', 'हंड्रेड' आणि 'कौन बनेगी शिखरवती' सारख्या अनेक ओटीटी प्रोजेक्टमध्ये दिसली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Silver Price Today: फक्त 'या' कारणांमुळे सोन्याचे भाव कोसळले; आज काय आहे 24 कॅरेचा भाव?

Monsoon Kitchen Care: पावसाळ्यात स्वयंपाकघरातील दमटपणा कमी करायचाय? मग 'या' गोष्टी नक्की करा

Khadakwasla Dam: 1961 चा महापूर… पण खडकवासला धरण वाचलं कसं? अज्ञात इतिहास वाचा

Rain-Maharashtra Latest live news update: NDA कडून सीपी राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपतीचा अर्ज भरला

Asia Cup 2025 Explainer : श्रेयस अय्यरने आणखी काय करायला हवं? आगरकर म्हणाला, ना त्याची चूक, ना आमची...; मग दोष कुणाचा?

SCROLL FOR NEXT