lara dutta
lara dutta 
मनोरंजन

'जाडी झालीये, म्हातारी दिसतेय': असं म्हणणाऱ्यांना लारानं फटकारलं

सकाळ डिजिटल टीम

Lara Dutta Age Shaming: बॉलीवूडमध्ये (bollywood) आपल्या हटकेपणासाठी प्रसिद्ध असणाऱ्या लाराला आता नेटकऱ्यांनी (netizens) तिच्या दिसण्यावरुन ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे तिनंही नेटकऱ्यांना परखडपणे उत्तर दिलं आहे. लारा (Lara Dutta) जशी तिच्या अभियासाठी ओळखली जाते त्याचप्रमाणे ती तिच्या परखडपणासाठी नेटकऱ्यांना परिचित आहे. तिनं टेनिसस्टार महेश भूपतीशी लग्न केलं. त्यानंतर ती फार कमी काळ बॉलीवूडमध्ये (bollywood) दिसली. गेल्या काही महिन्यांत तिच्या वेबसीरिज प्रदर्शित झाल्या होत्या. मात्र त्याला नेटकऱ्यांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. लाराला यापूर्वी देखील बॉडी शेमिंगचा सामना करावा लागल्याचे दिसून आले आहे. लाराचं असं म्हणणं आहे की, जसं जसं अभिनेत्रींचं वय वाढत जातं त्यानुसार त्यांना नेटकरी ट्रोल करत जातात. निर्माते आणि दिग्दर्शक यांचाही त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो. असेही तिनं सांगितलं होतं. (Lara Dutta Hits Back To Trollers)

इंडस्ट्रीमध्ये आपल्याला अनेकदा जाडेपणावरुन ट्रोल केल्याची खंत लारानं व्यक्त केली आहे. जाडी आणि म्हातारी दिसतेय. अशा प्रकारची प्रतिक्रिया सुरुवातीला बॉलीवूडमधूनच आली होती. त्यानंतर आता सोशल मीडियातून देखील मला त्यावरुन ट्रोल केलं जात आहे. याचा मला प्रचंड राग आहे. मी त्याविरोधात कुणाचे ऐकून घ्यायचा प्रश्नच नाही. मला कुणी बोलल्यास त्यांना मी उत्तर दिल्याशिवाय शांत बसणार नाही. अभिनेत्रींचं वय वाढल्यावर त्यांना बॉलीवूडमध्ये जज करण्यास सुरुवात होते. ही बाब मला लोकांना सांगायची आहे. दुसरीकडे नेटकरी देखील कोणताही विचार न करता आम्हाला ट्रोल करण्यास सुरुवात करतात. एका मीडिया हाऊसला दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेत्रींनं आपल्यावर होत असलेल्या टीकेविषयी सांगितलं आहे.

त्या मुलाखतीमध्ये लारानं सांगितलं की, बॉलीवूडमध्ये गुणवान अभिनेत्री आहे. त्यामध्ये माधुरी दीक्षित, राणी मुखर्जी आणि मी यांच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. मात्र आम्ही जेव्हा स्क्रिनवर येतो तेव्हा आम्हाला ट्रोल केले जाते. लोकं वेगवेगळ्या प्रकारची कमेंट करु लागतात. आता ती म्हातारी दिसू लागली आहे. ती भलतीच जाडही दिसत आहे. अशाप्रकारच्या कमेंट जेव्हा येतात तेव्हा मात्र कमालीचं वाईट वाटायला लागतं. मात्र वास्तव असं आहे की, लोकं काहीही विचार करायला मागत नाही. जे सेलिब्रेटी आमच्यापूर्वी आले होते. ते आमच्यासाठी काही भूमिका लिहित आहे. त्यामध्ये रत्ना पाठक, नीना गुप्ता यांचे नाव घ्यावे लागेल. त्या आमच्यासाठी आदर्श आहेत. असेही लारानं यावेळी सांगितलं. मला कुणी काही बोलते याकडे मी फारसं लक्ष देत नाही. त्यांच्या बोलण्यानं मला काहीही फरक पडत नाही. फक्त आपण बोलताना थोडा विचार करण्याची गरज असल्याचे लारानं यावेळी सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

Pune School: स्कॉलरशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

MI Playoff Scenario : 8 सामने हरल्यानंतरही मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये जाऊ शकते का? समजून घ्या समीकरण

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट

SCROLL FOR NEXT