मनोरंजन

अक्षयच्या 'बेल बॉटम'मध्ये लारा दत्ताला ओळखलंत का? प्रेक्षकांना केलं चकीत!

बेल बॉटम चित्रपटामध्ये लाराने इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे.

प्रियांका कुलकर्णी

बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमारचा (akshay kumar) आगामी चित्रपट बेल बॉटमबद्दल (bell bottom) प्रेक्षक उत्सुक आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सर्वांचे लक्ष वेधले गेले ते इंदिरा गांधी यांच्या भूमिकेने. या चित्रपटामध्ये अभिनेत्री लारा दत्ताने (lara dutta) देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (indira gandhi) यांची भूमिका साकारली आहे. ट्रेलरमधील लाराच्या अभिनयामुळे आणि मेक-ओव्हरमुळे अनेक प्रेक्षकांनी तिला ओळखलेच नाही. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये लाराने ही भूमिका साकारताना आलेला अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

मुलाखतीमध्ये लारा म्हणाली, 'मी ही भूमिका साकारत आहे हे समजण्याआधीच जर कोणी हे ओळखले असते तर मी त्या व्यक्तीच्या संपूर्ण कुटुंबाला हा चित्रपट मोफत दाखवला असता. होय, ट्रेलरमधील इंदिरा गांधींची भूमिका साकारणारी अभिनेत्री मी आहे. मी या चित्रपटाची स्क्रिप्ट देखील वाचली नव्हती. मला एक कॉल आला आणि त्यांनी मला सांगितले की तू इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहेस. पण हे खरं आहे की तुमच्यावर खूप जबाबदारी असते जेव्हा तुम्ही अशा थोर व्यक्तीची भूमिका साकारता. '

पुढे लाराने सांगितले, 'मला इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना खूप संशोधन आणि अभ्यास करावा लागला. पण मला खूप मजा आली. माझ्यासाठी ही अशी संधी होती, ज्यासाठी मी आयुष्यभर कृतज्ञ राहीन.' बेल बॉटममध्ये लारासोबत अक्षय कुमार, वाणी कपूर आणु हुमा कुरेशी हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

बेल बॉटम या चित्रपटाचे दिग्दर्शन रणजित एम तिवारी यांनी केले आहे. वाशु भगनानी, जॅकी भगनानी, दीपशिखा देशमुख, मोनिषा अडवाणी, मधु भोजवानी आणि निखिल अडवाणी यासर्वांनी या चित्रपटाची निर्मिती केली. हा चित्रपट 19 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad Water Shortage : कराडकरांवर मोठं पाणीसंकट! वारूंजीतील जॅकवेल पाण्याबाहेर आल्याने चिंता वाढली; 1972 नंतर पहिल्यांदाच तीव्र पाणीटंचाईची भीती

Ayush Badoni double century: १९ चौकार, ३ षटकार! LSG च्या फलंदाजाचे सलग दुसरे द्विशतक... थेट वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी

'पारंपारिक कपड्यांमधून अश्लिलपणा काय दाखवता?' तारिणी फेम अभिनेत्री झाली ट्रोल, पैठणीचा बोल्ड ड्रेस घालणं पडलं महागात

अवघ्या २ वर्षांच्या चिमुकलीची तबल्यावर कमाल! १२ ताल वाजवून आणि म्हणून केला विक्रम; पाहा Video

Latest Marathi News Live Update : अमरावतीत लोकशाही भवनात मतमोजणी सुरू; १४ टेबलवर १४ हजार मतपत्रिकांची मोजणी

SCROLL FOR NEXT