Lashmika Sanjeevan passed away at the age of 24 due to heart attack SAKAL
मनोरंजन

Lashmika Sanjeevan: अवघ्या २४ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीच्या निधनाने हादरली सिनेसृष्टी

लक्ष्मीका संजीवनच्या निधनाने इंडस्ट्रीला हादरा बसलाय

Devendra Jadhav

Lashmika Sanjeevan Death News: 'काक्का' या लघुपटातील पंजामीच्या दमदार भूमिकेने प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री लक्ष्मीका संजीवनचे गुरुवारी निधन झाले. ती अवघी २४ वर्षांची होती.

शुक्रवारी संयुक्त अरब अमिरातीच्या शारजाह येथे हृदयविकाराच्या झटक्याने तिचं निधन झाले. ती बँकेत काम करत होती. पल्लुरुथी येथील कचेरीपाडी येथील वाझवेलील घरातील सजीव आणि लिमिता यांची ती मुलगी आहे.

लक्ष्मीकाने 'ओरू यमंदन प्रेमकथा', 'पंचवर्ण थाथा', 'सौदी वेल्लाक्का', 'पुढायम्मा', 'उयारे', 'ओरू कुट्टनादन ब्लॉग' आणि 'नित्याहरिथा नायकन' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले.

लक्ष्मीकाच्या मृत्यूने तिच्या जवळच्या मित्रांना आणि मल्याळम चित्रपट उद्योगातील अनेकांना धक्का बसला आहे.

लक्ष्मीकाची शेवटची इंस्टाग्राम पोस्ट 2 नोव्हेंबर रोजी होती. ज्यामध्ये तिने सनसेटचा सुंदर फोटो शेअर केला होता. कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, ''मला आशा आहे सर्व अंधार प्रकाशमय होईल.''

तिच्या अकाली मृत्यूची बातमी व्हायरल झाल्यानंतर, चाहत्यांनी तिच्या शेवटच्या इंस्टाग्राम पोस्टवर तिला श्रद्धांजली वाहिली आहे.

लक्ष्मीकाने 'पंचवर्नाथथा', 'सौदी वेल्लाक्का', 'पुझयम्मा', 'उयारे', 'ओरु कुट्टनादन ब्लॉग', 'नित्याहरिथा नायगन' अशा सिनेमांंमध्ये अभिनय केलाय.

तिने साऊथ सुपरस्टार डुलकीर सलमानसोबत 'ओरु यमंदन प्रेमकथा' या चित्रपटांमध्ये केलाय. तिच्या अकस्मात निधनाने तिचे चाहते आणि कुटुंबिय हळहळ व्यक्त करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Coaching Center Blast: भयंकर! कोचिंग सेंटरमध्ये मोठा स्फोट, दोन विद्यार्थी जागीच ठार, अनेक जखमी, घटनेने खळबळ

Madha Flood Crisis : मुख्यमंत्र्यांकडून पूरग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदतीची आशा : गोपीचंद आमदार पडळकर

Latest Marathi News Live Update : मीरा भाईंदर: थायलंड-म्यानमार सायबर रॅकेटचा पर्दाफाश

FASTag New Rule : आता नाही द्यावा लागणार डबल टोल! 'UPI पेमेंट'ने पैसे वाचणार

KDMC News : 14 गाव, 27 गाव आताच बाहेर काढून त्यांची स्वतंत्र नगरपालिका करा, 27 गाव संघर्ष समिती अध्यक्ष खासदार सुरेश म्हात्रे यांचा इशारा

SCROLL FOR NEXT