lata kare, sonu kakkar file image
मनोरंजन

बारामतीच्या लता आजी Indian Idol मध्ये, परीक्षकही झाले भावूक

लता आजींने आपल्या संघर्षमय प्रवासाने सर्वांना प्रेरित केले.

प्रियांका कुलकर्णी

बारामतीच्या लता करे या आजींनी नुकतीच इंडीयन आयडॉलच्या मंचावर 'सिनियर सिटिझन'या स्पेशल एपिसोडसाठी हजेरी लावली. यावेळी त्या शोमधील स्पर्धक पवनदीप राजनला सपोर्ट करण्यासाठी आल्या होत्या. लता आजींनी आपल्या संघर्षमय प्रवासाने सर्वांना प्रेरित केले. लता करे यांनी पहिल्यांदा पतीच्या हृदयविकारावरील उपचारासाठी अनवाणी धावत प्रथम क्रमांक मिळविला होता. त्यानंतर त्या चर्चेत आल्या होत्या.(lata kare of baramati honored in indian idol singer sonu kakkar help rs 1 lakh 21 thousend)

इंडियन आयडॉल या शोमध्ये लता आजींची ही कहाणी ऐकून गायिका सोनू कक्करने त्यांना 1 लाख 21 हजार रूपयांची मदत केली. इंडियन आयडॉल शोमध्ये लता आजींनी 'जिंदगी की यही रीत है, हार के बाद ही जित है' हे गाणे गात सर्वांचे मनोरंजन केले. त्यांच्या या गाण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

लता आजींचा संघर्ष

बारामती येथील लता करे 2013 मध्ये बारामती शहरातील मॅरेथॉन स्पर्धेत धावल्या होत्या. लता करे यांनी पहिल्यांदा पतीच्या हृदयविकारावरील उपचारासाठी अनवाणी धावत प्रथम क्रमांक मिळविला होता.पतीच्या उपचारासाठी वयाच्या 64 व्या वर्षी धावणाऱ्या लता करे यांनी मिळविलेल्या विजयानंतर सर्वत्र त्यांचे मोठे कौतुक झाले. त्यानंतर सलग 3 वर्ष त्यांनी वयाची तमा न बाळगता बारामती येथील आयोजित स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवित हॅट्रीक साधली. बारामतीमधील रुग्णालयात कोरोनाचे उपचार सुरू असताना त्यांच्या पतीचे नुकतेच निधन झाले. पतीसाठी अनवाणी धावत स्पर्धा जिंकणाऱ्या करे यांची आयुष्याच्या सत्तरीकडे वाटचाल करणाऱ्या वयातील जिद्द आणि यश पाहुन त्यांच्या जीवनावर चित्रपट देखील काढण्यात आला आहे. 'लता भगवान करे, एक संघर्षकथा’ असे या चित्रपटाचे नाव आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT