lata-mangeshkar 
मनोरंजन

लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण; ब्रीच कँडीमध्ये आयसीयुत उपचार सुरु

सकाळ डिजिटल टीम

९२ वर्षांच्या असलेल्या लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

भारताची गानसम्राज्ञी आणि भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना शनिवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ९२ वर्षांच्या असलेल्या लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यांच्यावर मुंबईतील (Mumbai) ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

लता मंगेशकर यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आली आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांना खबरदारी म्हणून आयसीयुमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यांच्या वयोमानानुसार उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्या प्रायव्हसीचा आदर करा आणि त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करा अशी विनंती लता मंगेशकर यांची भाची रचना यांनी केली आहे.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही लता मंगेशकर यांची टेस्ट पॅाझीटीव्ह आल्याचं सांगितलं. पेडणेकर म्हणाल्या की, लता मंगेशकर यांची प्रकृती व्यवस्थित आहे. त्यांना सौम्य लक्ष आहेत. त्यामुळे त्या घरी सुद्धा राहू शकतात. किंवा रुग्णालयात ही राहु शकतात. मी स्वतः डॉक्टरांच्या टीमला जाऊन आता भेटणार आहे आणि भेटून विचारपूस करेन असंही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बँकांचा ३ दिवसांचा संप मागे! बैठकीनंतर रात्री उशिरा निर्णय; काय झाली चर्चा?

विश्रांतवाडीत ११ वर्षीय मुलीवर हातपाय बांधून अत्याचाराचे आरोप, ५२ वर्षांच्या नराधमाला अटक; रस्ता रोको आंदोलन

Divya Shinde Arrest : बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीची पोलीस कोठडीत रवानगी, डॉक्टरसोबत का झालेला वाद?

Virat Kohli Records: विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड; जगात असा पराक्रम कुणी केला नव्हता, गावस्करांच्या विक्रमाशीही बरोबरी

Pune Crime: गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीत चोरट्यांचा डल्ला; पुण्यात १४ घटनांत ९.७७ लाखांचे दागिने लंपास

SCROLL FOR NEXT