Lata Mangeshkar Google
मनोरंजन

लता मंगेशकरांना घरातील 'या' व्यक्तीमुळे झाली कोरोनाची लागण

ब्रीजकॅंडी इस्पितळात त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

प्रणाली मोरे

गानसम्राज्ञी लता मंगेशकर(Lata Mangeshkar) यांचं वय आज ९२ वर्षे आहे. आज वयोपरत्वे त्या फारशा अॅक्टिव्ह नसल्या तरी त्यांनी संगीतक्षेत्रात करून ठेवलेली कामगिरी त्यांच्या चाहत्यांसाठी एक मोठं गिफ्टच आहे असं म्हणावं लागेल. वयाची नव्वदी गाठत असताना त्यांनी आपले धाकटे बंधू ज्येष्ठ संगीतकार ह्दयनाथ मंगेशकर यांच्यासाठी गाणं गायलं होतं. तोच गोडवा,मधाळपणा त्या गाण्यातनं रसिकांनी एन्जॉय केला होता,शेवटी दैवी देणगी. पण त्यानंतर लता दीदींनी गाणं थांबवलं. गेल्या दोन वर्षात तर त्या कुठे बाहेर पडलेल्या दिसल्या नाहीत. मंगेशकर कुटुंबातर्फे जो 'दिनानाथ मंगेशकर पुरस्कार' जाहीर होतो त्याच्या पत्रकार परिषदेत तरी त्यांची उपस्थिती असायचीच. पण यावेळी कोरोनामुळे त्या उपस्थित राहिल्या नाहीत. आणि अशातच त्यांना कोरोनाची लागण झाली ही बातमी आल्यानं हे कसं शक्य आहे यावर अनेक प्रश्न निर्माण केले गेले.

लता मंगेशकर पेडर रोडला रस्त्याला लागून असलेल्या एका आलिशान इमारतीत पहिल्या मजल्यावर राहतात. त्यांच्या घरी त्यांच्यासोबत बहिण उषा मंगेशकरही राहतात. तसंच अनेक कर्मचाऱ्यांचा राबता त्यांच्या घरी असतो. लता मंगेशकर यांची काळजी घ्यायला तर एक मावशी कायम त्यांच्यासोबत असतात. ज्या प्रत्येक गोष्टीत लता दीदींची काळजी घेत असतात. तसेच घरात भाजी आणणे,इतर सामानांची खरेदी-विक्री करण्यासाठी अन्य कर्मचारी ये-जा करतात ते वेगळे. आता बातमी येत आहे की दोन वर्ष घरातून बाहेरही न पडलेल्या किंवा कोणाच्याही फार संपर्कात न येऊनही लता दीदींना कोरोनाची लागण ही त्यांच्याच घरात ये-जा करणा-या कर्मचाऱ्यांमुळे झाल्याचं बोललं जातंय. त्या कर्मचाऱ्याची कोरोना चाचणी केली असता ती पॉझीटिव्ह आल्याचं बोललं जातंय.

लता दीदींवर मुंबईतील ब्रीजकॅंडी इस्पितळात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असली तरी त्यांना कोविड न्युमोनिया झाल्यामुळे त्यांना डॉक्टरांच्या निगराणीखाली आणखी काही दिवस ठेवण्यात येणार असल्याचं बोललं जातंय. ब्रीजकॅंडी इस्पितळात डॉ. प्रतित समदानी आणि त्यांची टीम लता दीदींवर उपचार करत आहेत. लता दीदी लवकर कोरोना मुक्त होवोत आणि सुदृढ घरी परत येवो या शुभेच्छा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drug Racket : पुण्यात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर; मोठे रॅकेट उघड, चार जण अटकेत

Satara Politics: सातारा झेडपीची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रद्द करा;राष्ट्रवादीचे विभागीय आयुक्तांकडे अपील, जिल्हाधिकारी, एसपींबाबत तक्रार!

Yo Yo Honey Singh Pune show : यो यो हनी सिंगचा पुण्यातला शो होणार रद्द, थेट एसपींकडे तक्रार; गाण्यावर घेत आक्षेप

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

SCROLL FOR NEXT