Lata Mangeshkar Sakal
मनोरंजन

Lata Mangeshkar: अनंत, कालातीत स्वर

लता मंगेशकर या आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील, विशेषतः कलाकाराच्या आयुष्यातील देवी सरस्वतीच आहेत.

सकाळ वृत्तसेवा

लता मंगेशकर या आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील, विशेषतः कलाकाराच्या आयुष्यातील देवी सरस्वतीच आहेत. जगभरातील संगीत क्षेत्रातील प्रत्येक विद्यार्थ्यासाठी स्वरांचा, परिपूर्णतेचा, संगीतातील सौंदर्याचा आदर्श म्हणजे लता दीदी. त्या भारताचा आवाज होत्या. त्यांच्या आवाजाने जगभरात भारताला ओळखले जात होते. (Lata Mangeshkar Memories by Kaushiki Chakraborty)

- कौशिकी चक्रवर्ती, प्रसिद्ध शास्त्रीय गायिका

मी देखील लहानपणापासून त्यांना गुरुस्थानी मानत वाटचाल सुरू केली. मला अजूनही तो दिवस आठवतो, ज्या दिवशी मला पहिल्यांदा त्यांच्यासमोर गाण्याची संधी मिळाली होती. माझ्या आयुष्यातील तो सगळ्यात अविस्मरणीय दिवस होता. दीदी पहिल्याच रांगेत बसल्या होत्या. त्यांच्यासमोर गायचे आहे, या कल्पनेनेच मी अतिशय नर्व्हस झाले होते, पण माझे सादरीकरण झाल्यानंतर त्यांनी माझे भरभरून कौतुक केले. त्यांनी मला आशीर्वाद दिले, शुभेच्छा दिल्या. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने, त्यांच्या औदार्याने मी अक्षरशः भारावून गेले होते. त्यानंतरही मी काही वेळा त्यांना त्यांच्या मुंबईत घरी भेटले. त्यांनी माझी निवड ‘दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कारासाठी केली, हे मी माझे भाग्य मानते.

मुंबईत षण्मुखानंद सभागृहात लता दीदींच्या हस्ते आणि मंगेशकर कुटुंबीयांच्या उपस्थितीत हा पुरस्कार मला मिळाला. लता दीदींशी अनेकदा माझे फोनवर बोलणे होत असे. त्या माझे गाणे ऐकल्यावर आवर्जून सांगत असत. माझ्या कुटुंबाची विचारपूस करत असत. माझ्या मुलाला दर वाढदिवसाला त्या शुभेच्छा देत असत.

लता दीदींच्या निधनाने संगीत क्षेत्राची मोठी हानी झालीच, त्याचबरोबर आपल्या घरातील कोणीतरी, आपल्या कुटुंबातील सदस्य हरपल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यांचे गाणे ऐकले नाही, असा एकही दिवस नव्हता. त्या प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होत्या. त्यामुळेच त्या अनंत आहेत. कालातीत आहेत. त्या आणि त्यांचे स्वर शाश्वत आहेत. त्यांच्या प्रत्येक स्वरातून त्या आपल्यात राहतील. जोपर्यंत संगीत आहे, तोवर त्या आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग राहतील. त्यांचे आशीर्वाद आपल्यासह कायम राहोत, हीच प्रार्थना.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्याला सलग चौथ्या दिवशी पावसानं झोडपलं, घरांमध्ये शिरलं पाणी; काही ठिकाणी गारपीट

Latest Marathi News Live Update : बाणेर रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूकीस अडथळा

Talwar Baba: भयंकर! तंत्र-मंत्र आणि भीतीचा खेळ... महाराष्ट्रातील ‘तलवार बाबा’चा काळा चेहरा उघड; 'असं' करायचा शोषण

He Kay Navin Review: 'हे काय नवीन' मध्ये खरंच काही नवीन आहे का? कशी आहे प्रिया उमेशची नवी वेब सीरिज?

Samruddhi Expressway Accidents : काय आहे 'हायवे हिप्नोसिस'? समृद्धीवर का होतायत अपघात? पूल ठरतात धोकादायक!

SCROLL FOR NEXT