Lata Mangeshkar sakal
मनोरंजन

Lata Mangeshkar: रियाज, तानपुरा अन् मिरज...

लतादीदींच्या निधनाचे वृत्त समजताच मिरजेच्या सतारमेकर गल्लीतही तंतुवाद्य कारागिरांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली.

प्रमोद जेरे

मिरज : भारतरत्न लता मंगेशकर यांची शास्त्रीय संगीताची साधना ही ज्या तानपुऱ्यांच्या सुरांसोबत घडली तो तानपुरा हा मिरजेच्या विलायतखान सतारमेकर यांनी घडवला आहे. मुळात हा तानपुरा विलायतखान सतारमेकर यांनी लतदीदींचे वडील मास्टर दिनानाथ मंगेशकर यांच्यासाठी बनवून दिला होता. हाच तानपुरा स्वतः लतादीदी नियमित रियाजासाठी घेत असत. त्यामुळे मिरजेतील तंतुवाद्य कारागीर मंडळींना आजही अभिमान आहे. (Lata Mangeshkar Memories)

लतादीदींच्या निधनाचे वृत्त समजताच मिरजेच्या सतारमेकर गल्लीतही तंतुवाद्य कारागिरांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली. त्यांच्यासाठी विशेष प्रार्थनाही करण्यात आली. जुन्या ज्येष्ठ कारागिरांनी मंगेशकर कुटुंब व तंतुवाद्यांच्या कारागीरांच्या स्नेहाच्याही आठवणी सांगितल्या.

त्यापैकीच एक कारागीर मज्जिदभाई सतारमेकर यांनी दीनानाथ मंगेशकर आणि मिरजेतील विलायतखान सतारमेकर यांच्या आठवणी सांगताना दीनानाथ मंगेशकर व मिरजेतील तंतुवाद्य कारागिरांचे जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे सांगितले. त्याशिवाय दिनानाथ मंगेशकर यांच्या पश्चात हाच तानपुरा स्वतः लतादीदी रियाजासाठी वापरत असल्याने आणि त्यांच्या प्रसिद्ध अनेक छायाचित्रातील तानपुरा हे मिरजेचा असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो, असे सांगितले. या आठवणींमुळे व शास्त्रीय संगीत क्षेत्रातील सर्वोच्च सूर हरवल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT