lavani singer Sulochana Chavan passes away in mumbai  sakal
मनोरंजन

Sulochana Chavan passes away: लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे निधन..

अवघ्या जगाला लावणीची भुरळ पडणारा आवाज हरवला..

नीलेश अडसूळ

sulochana chavhan: मराठी मनोरंजन विश्वासाठी अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. साठ वर्षांहून अधिक काळ आपल्या गायनाने रसिकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या महाराष्ट्राच्या लावणीसम्राज्ञी ज्येष्ठ पार्श्‍वगायिका सुलोचना चव्हाण यांचे आज शनिवारी 10 डिसेंबर रोजी निधन झाले आहे. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

(lavani singer sulochana chavhan death)


सोळावं वरीस धोक्याचं.. उसाला लागलं कोल्हा.. आंबा आलाय पाडला, पावणा ;पुण्याचा आलाय गं.. अशा शेकडो लावण्या ज्यांनी अजरामर केल्या असा संगीत क्षेत्रातला बुलंद आवाज आज हरपला. काही महिन्यांपूर्वीच त्यांना भारत सरकारच्या 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यावेळीच त्यांची प्रकृती काहीशी ठीक नसल्याने त्यांना व्हील चेअर वरून आणण्यात आले होते.

काही महिन्यांपूर्वी त्या घरात पडल्या होत्या. त्यांच्या कमरेचं हाड मोडलं होतं. त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. पण त्याला फारसा सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने त्या तेव्हापासून एकाच जागेवर होत्या. शिवाय वयामुळेही प्रकृती खालावली होती. गेल्या काही दिवसात त्यांची प्रकृती अहडीक चिंताजनक होती. त्यांच्या स्मृतीही कमजोर होत होत्या. त्यावर इलाज नसल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याने त्या घरीच होत्या. अखेरी शनिवारी गीरगाव येतील राहत्या घरीच त्यांचे निधन झाले. अशी माहिती त्यांचा मुलगा विजय चव्हाण यांनी 'ई-सकाळ'ला दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Sambhaji Maharaj Statue : सांगलीत रात्रीतून छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा प्रयत्न; पोलिसांकडून तात्काळ कारवाई

Nashik Dindori Car Accident : नाशिकच्या दिंडोरीत कार विहिरीत कोसळली, ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत, ​स्नेहसंमेलन आटोपून घरी परतताना घटना

Spicy Thecha Paneer Wrap: वीकेंड नाश्त्यासाठी बनवा झणझणीत थेचा-पनीर रॅप; फक्त २० मिनिटांत तयार होणारा हेल्दी ऑप्शन!

Daily Panchang 4 April 2026 : शनिवारचे शुभ मुहूर्त, राहूकाळ आणि दिनविशेष जाणून घ्या

CSK vs PBKS Live: चेन्नई सुपर किंग्स 'घरी'पण हरले! पंजाब किंग्सचे फलंदाज चेपॉकवर बरसले, श्रेयसचा संघ IPL 2026 Point Table मध्ये अव्वल

SCROLL FOR NEXT