lavani singer Sulochana Chavan son vijay chavan request to government Give the award on time sakal
मनोरंजन

Sulochana Chavan: माझी सरकारला कळकळीची विनंती.. सुलोचना चव्हाण यांच्या मुलाने व्यक्त केली खंत..

लावणीसाम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे नुकतेच निधन झाले, यावेळी त्यांचे चिरंजीव आणि ढोलकीपटू विजय चव्हाण यांनी आपली खंत व्यक्त केली.

नीलेश अडसूळ

sulochana chavhan: साठ वर्षांहून अधिक काळ आपल्या गायनाने रसिकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या महाराष्ट्राच्या लावणीसम्राज्ञी ज्येष्ठ पार्श्‍वगायिका सुलोचना चव्हाण यांचे काल, शनिवारी 10 डिसेंबर रोजी निधन झाले. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आपल्या दमदार आवाजाने सुलोचना बाईंनी रसिकांची माने तृप्त केली. शेकडो गाणी आज त्यांच्या आवाजाने अजरामर झाली आहेत. त्यांना काही महिन्यांपूर्वीच भारत सरकारच्या 'पद्मश्री' पुरस्काराने गौरविण्यात आले. पण याबाबत त्यांच्या मुलाने एक मोठी खंत 'इ-सकाळ'शी बोलताना व्यक्त केली आहे.

(lavani singer Sulochana Chavan son vijay chavan request to government Give the award on time)

महाराष्ट्राच्या लावणीसम्राज्ञी ज्येष्ठ पार्श्‍वगायिका सुलोचना चव्हाण यांनी मराठीसह हिंदी, गुजराती, भोजपुरी, तमीळ, पंजाबी आदी भाषांमध्येही पार्श्वगायन केले आहे. ज्यावेळी लावणीला फारशी प्रतिष्ठा नव्हती, तेव्हाही त्या अत्यंत सन्मानाने लावणी गात होत्या आणि लावणीला प्रतिष्ठा मिळवून देत होत्या. त्यांनी आजवर शेकडो गाणी गायली. सामाजिक कामातही त्यांचे प्रचंड योगदान आहे. पण त्यांना 'पद्मश्री' पुरस्कार मात्र वयाच्या नव्वदीत मिळाला. आयुष्याच्या शेवटी असे पुरस्कार दिल्याने त्याचे काहीच मूल्य राहत नाही, अशी खंत सुलोचना बाईंचा मुलगा विजय चव्हाण यांनी 'इ-सकाळ'शी बोलताना व्यक्त केली.

हेही वाचा : सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

विजय चव्हाण स्वतः उत्तम ढोलकी वादक आहेत. त्यांनी आजवर हजारो गाण्यांसाठी ढोलकी वादन केले आहे. 'नटरंग'या गाजलेल्या चित्रपटातही त्यांनीच ढोलकी वादन केले आहे. याशिवाय देशविदेशातही ते मोठमोठे कार्यक्रम करतात. आपल्या आईसोबतही त्यांनी बरेच कार्यक्रम गाजवले आहेत. सुलोचना बाईंच्या निधनाने त्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांनी आपला मोठा आधार गमावला आहे. पण आपल्या आईचा यथोचित सन्मान झाला नाही, अशी नाराजी त्यांनी 'सकाळ' कडे व्यक्त केली.

ते म्हणाले, गेल्या काही महिन्यात आईची तब्येत पूर्ण खालावली होती. आईला २८ मार्चला पद्मश्री पुरस्कार मिळाला तेव्हा पण आई व्हिलचेअरवर होती. तिची प्रकृती तेव्हाही नाजूकच होती. बऱ्याच गोष्टी तिला आठवतही नव्हत्या. त्यामुळे तिला पुरस्काराचा आनंदही नीट घेता आला नाही. आयुष्यभर कार्य करून अगदी शेवटला पुरस्कार दिला तर त्याला काय अर्थ आहे. त्यामुळे राज्यशासना,केंद्रशासनाला माझी कळकळीची विनंती आहे की.. पुरस्कार वेळेत द्या,' असे विजय चव्हाण 'इ-सकाळ'शी बोलताना म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Mumbai Trains: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १७ जुलैपर्यंत पुणे-मुंबई २५ गाड्यांचे मार्ग बदलले, दौंड-मनमाड मार्गे गाड्या वळवल्या..

Maharashtra land Acquisition: भूसंपादन प्रक्रियेला गती देण्यासाठी राज्याचा मोठा निर्णय; १०३ विशेष भूसंपादन अधिकारी पदांची पुनर्रचना, प्रकल्पांना मिळणार वेग

Latest Marathi News Live Update : लाडकी बहीण योजनेतून 90 लाखांपेक्षा जास्त महिलांची नावे वगळली; सर्वाधिक संख्या बीड जिल्ह्यातील

Kolhapur Monsoon Rainfall : धरण क्षेत्रांत 41 दिवसांत 36 वेळा अतिवृष्टी; सर्वाधिक पाटगाव क्षेत्रात, सर्फनालामध्ये 24 तासांत 347 मिमी.ची नोंद

उत्तम गुंतवणूक : एलेनबारी इंडस्ट्रियल गॅसेस (शुक्रवारचा बंद भाव : रु. २९४.२५)

SCROLL FOR NEXT