Lawrence Bishnoi And Salman Khan
Lawrence Bishnoi And Salman Khan  
मनोरंजन

Lawrence Bishnoi : 'सलमाननं माफी मागावी नाहीतर...' गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची पुन्हा जाहीर धमकी!

सकाळ डिजिटल टीम

Lawrence Bishnoi : प्रख्यात पंजाबी गायक सिद्धु मुसेवालाच्या हत्येनं मनोरंजन विश्वात मोठी खळबळ उडाली होती. या हत्याकांडातील प्रमुख संशयित आरोपी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईनं मोठा खुलासा केला आहे. त्यानं दिलेल्या एका मुलाखतीतून हत्याकांड आणि त्याचं बॉलीवूडचं कनेक्शनही समोर आले आहे.

बॉलीवूडचा भाईजान सलमान खानला जीवे मारण्याची धमकी लॉरेन्स बिष्णोईनं दिली होती. त्यानंतर वेगळ्याच चर्चेला उधाण आले होते. आता एबीपी न्युजनं घेतलेल्या मुलाखतीतून लॉरेन्सनं काही धक्कादायक खुलासे केले आहेत. आपण सलमानला जीवे मारण्याची धमकी का दिली याविषयी त्यानं सांगितलं आहे. सिद्धु मुसेवालाच्या हत्याकांड प्रकरणात लॉरेन्सवर गंभीर आऱोप करण्यात आले आहे.

बिश्नोईनं सांगितलं की, काळवीट शिकार प्रकरणात सलमानकडून चूक झाली होती. त्याप्रकरणात सलमानं आमच्या समाजातील लोकांच्या भावना दुखावल्या होत्या. आमची अपेक्षा होती की, त्यानं एकदा का होईना माफी मागावी. मात्र तसे झाले नाही. त्यानं काही माफी मागितली नाही. लॉरेन्सचे सलमानबाबत असणारे मत हे भलतेच आक्रमक असल्याचे दिसून आले आहे.

मुंबई पोलिस माझी चौकशी करण्यासाठी आले होते. मी चिठ्ठी पाठवल्याचे म्हणतात पण तसे काही नाही. ती चिठ्ठी काही सापडली नाही. माझे म्हणणे आहे की, त्यानं माफी मागावी. पण त्यानं माफी मागितली नाही तर मग आम्हाला आमच्या पद्धतीनं कारवाई करावी लागेल. अशा शब्दांत लॉरेन्सनं धमकी दिली आहे. ही धमकी नसून आमची विनंती आहे की त्यानं माफी मागावी असं लॉरेन्सनं म्हटलं आहे.

आम्ही बाकी कुणाला काही बोललो नाही. तेव्हा आमचे जे म्हणणे ते लक्षात घ्यावं. सलमाननं या गोष्टीचा विचार करावा. आमच्या समाजाचा त्यानं अपमान केला आहे. मला काही समाजाचा पाठींबा नाही. पण मला वाटतं की, त्यानं नेहमी अपमानित केलं आहे. त्यामुळे त्यानं माफी मागावं असे वाटते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT