swanandi berde 
मनोरंजन

स्वानंदी बेर्डे आता होणार सौ. माने; नव्या प्रवासाला सुरुवात

स्वाती वेमूल

मराठी सिनेसृष्टीतील विनोदाचे सम्राट म्हणून ओळखले जाणारे दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुलगी लवकरच एका नव्या प्रवासाला सुरुवात करतेय. स्वानंदी बेर्डे नाटकात पदार्पण करत असून तिच्या पहिल्याच नाटकाची घोषणा करण्यात आली आहे. 'धनंजय माने इथंच राहतात..' असं या नाटकाचं नाव असून यामध्ये स्वानंदी सौ. मानेंच्या भूमिकेतून नाट्यरसिकांच्या भेटीला येणार आहे. स्वानंदीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो पोस्ट करत ही आनंदाची बातमी चाहत्यांना सांगितली आहे. 

लक्ष्मीकांत बेर्डे यांनीसुद्धा नाटकातूनच करिअरची सुरुवात केली होती. त्यांच्याकडून विनोदाचं टायमिंग शिकण्यासारखं आहे, असं स्वानंदीने 'मुंबई तक'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. 'श्री आणि सौ. माने.. माझ्या या नवीन प्रवासासाठी मी खूपच उत्सुक आहे आणि हा आनंद तुमच्यासमोर शेअर करतेय. नवीन नाटक 'धनंजय माने इथंच राहतात' लवकरच तुमच्या भेटीला घेऊन येतोय,' अशी पोस्ट स्वानंदीने लिहिली आहे. यासोबतच तिने नाटकाच्या पटकथेसोबत फोटो पोस्ट केले आहेत.  

'धनंजय माने इथेच राहतात का', हा लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ आणि सचिन पिळगावकर यांच्या 'अशी ही बनवाबनवी' या चित्रपटातील गाजलेला संवाद आहे. याच नावाचं नाटक येत्या मार्च महिन्यात नाट्यरसिकांच्या भेटीला येतंय. राजेश देशपांडे या नाटकाचं दिग्दर्शन करत असून यामध्ये स्वानंदीसोबतच तिची आई व अभिनेत्री प्रिया बेर्डेसुद्धा प्रमुख भूमिकेत आहेत.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

SCROLL FOR NEXT