Thalapathy Vijay film Leo leaked in HD print 
मनोरंजन

Leo Online Leak: 'लिओ' ची एचडी कॉपी ऑनलाईन लिक, थलापतीला मोठा झटका! निर्मात्यांचे धाबे दणाणले

थलापती विजयचा लिओ नावाचा चित्रपट ऑनलाईन लिक झाल्यानं निर्मात्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

युगंधर ताजणे

Thalapathy Vijay film Leo leaked in HD print : ज्या चित्रपटाची प्रेक्षक आतूरतेनं वाट पाहत होते तो थलापती विजयचा लिओ हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटानं जगभरात अॅडव्हान्स बूकींगचे विक्रम केले होते. त्याला पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत असताना निर्मात्यांना मोठा दणका बसला आहे.

थलापती विजयचा लिओ नावाचा चित्रपट ऑनलाईन लिक झाल्यानं निर्मात्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या चित्रपटाची एचडी प्रिंट ऑनलाईन व्हायरल झाल्यानं निर्मात्यांनी आता संबंधितांविरोधात आक्रमक पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी अनेक महत्वाच्या चित्रपटांबाबत हा प्रकार घडल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे निर्मात्यांना मात्र मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागलं आहे.

प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच त्याची एच डी प्रिंट काही जणांच्या मोबाईलवर आल्यानं एकच खळबळ उडाल्याचे दिसून आले आहे. यामुळे विजयच्या चाहत्यांना देखील धक्का बसला आहे. अशाप्रकारे सोशल मीडियावर चित्रपटाच्या प्रिंट लिंक उपलब्ध झाल्यानं त्याचा तोटा निर्मांत्याबरोबरच कलाकारांना देखील सहन करावा लागतो. त्यामुळे अनेक आर्थिक प्रश्न तयार होतात.

अशा प्रकारची पायरसी रोखण्यासाठी सायबर विभागाकडून मोठ्या प्रमाणात पाऊलं उचलली जातात. मात्र तरीही संबंधित सायबर चोरटे कोणत्या ना कोणत्या मार्गातून अशाप्रकारे चित्रपटाच्या लिंक व्हायरल करत असल्याचे दिसून आले आहे.

२०२३ मधील सर्वाधिक चर्चेतील चित्रपट म्हणून लिओ कडे पाहिले जात होते. तो चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये गर्दी करु लागले आहेत. त्याच्या अॅडव्हान्स बुकींगला केवळ भारतच नाहीतर जगभरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अशावेळी हा चित्रपट ऑनलाईन लिक झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT