Leonardo Di Caprio Hollywood Actor Love rumours with Nilam Gill
Leonardo Di Caprio Hollywood Actor Love rumours with Nilam Gill  esakal
मनोरंजन

Leonardo DiCaprio Dating: टायटॅनिकचा जॅक निलमच्या प्रेमात? डेटिंगची रंगलीय चर्चा

युगंधर ताजणे

Hollywood Leonardo DiCaprio's Outing With Indian-Origin Model Neelam Gill : एखाद्या सिनेरसिकाला टायटॅनिकचा जॅक माहिती नाही असं होणार नाही. प्रसिद्ध दिग्दर्शक जेम्स कॅमेरुन यांच्या टायटॅनिक कलाकृतीनं साऱ्या जगाला वेडं केलं होतं. त्या चित्रपटाला दहाहून अधिक ऑस्करही मिळाले होते. त्या चित्रपटापासूनच जॅकची भूमिका करणारा लिओनार्दो दी कॅप्रियो आणि रोझची भूमिका करणारी केंट व्हिन्स्लेट माहिती झाली होती.

टायटॅनिकनंतर लिओनार्दोकडे चित्रपटांची लाईन लागली होती. त्यानं ब्लड डायमंड, शटर आयसलँड, डिपार्टेड, कॅच मी इफ यु कॅन सारख्या चित्रपटातून आपण किती ताकदीचे कलाकार आहोत हे दाखवून दिले होते. लिओनार्दो हा त्याच्या रोमँटिक अंदाजासाठी देखील फेमस आहे. तो आणि त्याचे खासगी आयुष्य त्याच्या चाहत्यांसाठी कुतूहलाचा विषय आहे.त्यामुळेच की काय लिओनार्दोच्या गर्लफ्रेंडची नेहमीच चर्चा होत असते. आता सोशल मीडियावर लिओनार्दोच्या नव्या गर्लफ्रेंड आणि तिच्या सोबतच्या डेटिंगची चर्चा होताना दिसतेय.

Also Read - Silicon Bank दिवाळखोरीः भारतावर नाही होणार दीर्घकालिन परिणाम...का ते वाचा!

४८ वर्षांचा लिओनार्दो हा २८ वर्षांच्या निलम गिलला डेट करत असल्याची चर्चा आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निलम ही भारतीय वंशाची असून ती मॉडेलिंग क्षेत्रात प्रसिद्ध आहेत. पेज सिक्सनं दिलेल्या माहितीनुसार ऑस्कर विजेता अभिनेता लिओनार्दो हा एका भारतीय वंशाच्या अभिनेत्रीच्या प्रेमात असल्याची चर्चा आहे. या दोन्ही सेलिब्रेटीना लंडनमधील फायरहाऊसमध्ये स्पॉट करण्यात आले. यापूर्वी निलमनं तिच्या इंस्टाबायोमध्ये तिच्या नावाचा उल्लेख हा ब्रिटिश पंजाबी मॉडेल. असा आहे.

लिओनार्दो हा त्याच्या किलर्स ऑफ द फ्लॉवर्स मुनमुळे चर्चेत आला आहे. दुसरीकडे कान्स चित्रपट महोत्सवामध्ये निलमचे फोटोही व्हायरल झाले असून त्याची सगळीकडे चर्चा आहे. तिचा तो लूक चाहत्यांना घायाळ करुन गेला आहे. लिओनार्दो आणि त्याची एक्स गर्लफ्रेंड कॅमिला मोरोन हे तीन वर्षांपूर्वी ऑस्करच्या सोहळ्यात दिसले होते. त्यांचे चार वर्षांचे नाते हे आता वेगळ्या वळणावर येऊन ठेपल्याचे सांगण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: लॉकी फर्ग्युसनने तोडली रचिन-रहाणेची पार्टनरशीप, चेन्नईला तिसरा धक्का

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT