Vijay Deverakonda  Liger Movie
Vijay Deverakonda Liger Movie  Google
मनोरंजन

Liger: 'लायगर 200 कोटींची कमाई करणार', विजयला बतावणी भोवली!

युगंधर ताजणे

Tollywood Movie Liger: टॉलीवूडच्या विजयनं लायगरच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं असलं तरी ते प्रेक्षकांना काही भावलेलं नाही. त्याच्या प्रमोशनची जोरदार चर्चा होती. प्रेक्षकांनी विजयच्या लायगरकडे पाठ फिरवली (Bollywood Movie News) आहे. वास्तविक लायगरकडून खूप साऱ्या अपेक्षा होत्या. त्या पूर्ण करण्यात विजयला अपयश आले आहे. असे असताना त्यानं केलेलं ट्विट हे चर्चेत आलं आहे. तो म्हणाला होता माझा चित्रपट दोनशे कोटींची कमाई (Bollywood Vs Tollywood) नक्की करणार. एवढ्या आत्मविश्वासानं नेटकऱ्यांना सांगणाऱ्या विजयला आता टीकेला सामोरं जावं लागत असल्याचे दिसून आले आहे. जगन्नाथ पुरी यांनी दिग्दर्शित केलेल्या लायगरला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागत आहे.

बॉक्स ऑफिसवर गेल्या काही महिन्यांपासून बॉलीवूडच्या चित्रपटांचे प्रदर्शन फारसे प्रभावी नसल्याचे दिसून आले आहे. त्यात कार्तिक आर्यनच्या भुलभुलैय्याचा अपवाद सोडल्यास इतरांना फारसा प्रभाव पाडता आलेला नाही. त्यामुळे त्याचा परिणाम बॉलीवूडच्या आगामी चित्रपटांवर होत असल्याचे दिसून येत आहे. आमिर खानच्या लाल सिंग चढ्ढाची अवस्था दयनीय आहे. अक्षय कुमारच्या रक्षाबंधनने मान टाकली आहे. अशावेळी येत्या काळात शाहरुख आणि सलमानच्या चित्रपट प्रदर्शनाची प्रेक्षक वाट पाहत आहे. बॉलीवूड सेलिब्रेटींना त्यांनी प्रेक्षकांच्या भावना दुखावणारे वक्तव्ये करणे, त्यांना गृहित धरणे महागात पडले आहे.

यासगळ्यात विजयच्या वक्तव्यानं सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. त्यानं गेल्या काही दिवसांपूर्वी आपला आगामी चित्रपट हा दोनशे कोटींपेक्षा जास्त कमाई करेल असे म्हटले होते. प्रत्यक्षात जेव्हा त्याचा लायगर नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा मात्र त्याला 50 कोटींपेक्षा अधिक कमाई करता आलेली नाही. हा चित्रपट प्रदर्शित होऊन 2 दिवस झाले आहे. मात्र साऊथ झोन वगळता त्याला अन्य कुठेही फारशी प्रभावी कामगिरी करता आलेली नाही. असेही दिसून आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

'नाष्ट्याला राजकारणी खातो' म्हणणारे TN शेषन काँग्रेसकडून होते निवडणुकीच्या रिंगणात; भाजपच्या दिग्गज नेत्याला दिलं होतं आव्हान

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींनी छत्रपती शिवाजी महाराज, राणी चन्नम्मांचा अपमान केला, बेळगावात मोदींचा घणाघात

SCROLL FOR NEXT