Vijay Deverakonda movie news  sakal
मनोरंजन

Liger Movie: 'जास्त चरबी चढलीय का?' थिएटरचालक विजयवर संतापले

नेमकं काय झाले माहिती नाही पण विजय हा सातत्यानं वेगवेगळी वक्तव्ये करत सुटला आहे. त्याचा परिणाम असा की, त्याच्या दोन दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे.

युगंधर ताजणे

Liger Movie - नेमकं काय झाले माहिती नाही पण विजय हा सातत्यानं वेगवेगळी वक्तव्ये करत सुटला आहे. त्याचा परिणाम असा की, त्याच्या दोन दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. अनन्या पांडे आणि विजय देवराकोंडाच्या लायगरविषयी अनेकांना फार उत्सुकता होती. प्रत्यक्षात हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे दिसत आहे. आता तर थिएटरचालकांनी विजयच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. असं काय झालं की, त्यांनी विजयला धारेवर धरले हे आपण जाणून घेणार आहोत. विजयच्या अशा प्रकारच्या वागण्यामुळे त्याचे चाहते नाराज झाले आहे. त्यांनी सोशल मीडियावर त्याच्या विरोधात प्रतिक्रिया दिल्या आहेत.

गेल्या दोन ते तीन आठवड्यांपासून बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रेटींना सोशल मीडियावर नेटकरी ट्रोल करताना दिसत आहे. त्याचा पहिला फटका हा लाल सिंग चढ्ढाच्या आमिर खानला बसला. त्यानंतर अक्षय कुमारला देखील नेटकऱ्यांनी हैराण केले. त्याचा रक्षाबंधन हा आला केव्हा आणि गेला केव्हा हे देखील कळले नाही. बॉयकॉट बॉलीवूड मुव्हीज या ट्रेंडच्या विळखात बॉलीवूडमधील सेलिब्रेटी सापडले आहेत. त्यामुळे त्यातून बाहेर कसे पडायचे हा त्यांच्यासमोरील मुख्य प्रश्न आहे. अशातच विजयनं स्वताच्या पायावर कुऱ्हाड मारुन घेतली आहे. थिएटर मालकांचा राग त्यानं ओढावून घेतल्यानं निर्मात्यांनी डोक्याला हात लावला आहे.

सोशल मीडियावर सध्या विजयचा लायगर हा बॉयकॉट करण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. विजयनं देशातील अनेक शहरांमध्ये जाऊन त्याच्या चित्रपटाचा प्रचार केला आहे. यासगळ्यात काही दिग्दर्शकांनी विजयला सडेतोड उत्तर दिलं आहे. सिंगल स्क्रिनवर लायगर लावण्यासंबंधी विजयनं वक्तव्य केले होते. विजयनं यापूर्वी नेटकऱ्यांना चित्रपट पाहायचा तर पाहा नाहीतर पाहू नका असे म्हटले होते. यामुळे थिटएर चालकांनी देखील सिंगल स्क्रिनवर पहिल्या दिवशी त्याचा शो घेण्यास टाळाटाळ केली होती. याचा मोठा फटका विजयला बसला होता.

थिएटर चालक मनोज देसाई यांनी फिल्मी फीवरला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये म्हटले आहे की, विजयची सिंगल स्क्रिनवाल्यांशी काय वैर आहे हे कळायला मार्ग नाही. लायगरवरुन तू किती उत्साही आहेस असा प्रश्न त्याला विचारल्यानंतर त्यानं चित्रपट पाहायचा तर पाहा नाहीतर नको... असं विधान केलं. त्यामुळे त्यानं जास्त चरबी आल्यासारखं वागू नये. अशी प्रतिक्रिया आता थिटएर चालकांकडून येताना दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT