Lisa Marie Presley, daughter of Elvis, dies aged 54
Lisa Marie Presley, daughter of Elvis, dies aged 54  sakal
मनोरंजन

Lisa Marie Presley: अमेरिकन गायिका लिसा मैरी प्रेस्ली यांचे निधन.. चार लग्न आणि बरंच काही..

नीलेश अडसूळ

Lisa Marie Presley Death: हॉलीवुडमधील लोकप्रिय अमेरिकन गायिका लिसा मैरी प्रेस्ली यांचे निधन झाले आहे. गुरुवारी लॉस एंजेलिस येथील कॅलाबस येथे राहत्या घरीच मैरी प्रेस्ली यांना हृदय विकारायचा झटका आला.

त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले पण त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. वयाच्या ५४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

लिसा मैरी प्रेस्ली ही एल्विस प्रेस्ली यांचीची एकुलती एक मुलगी होती. एल्विस प्रेस्ली ही बॉलीवुडचे जगत विख्यात गायक आहेत. संगीताच्या विश्वात तिंन खूप नाव कमावलं होते. वृत्तानुसार, लिसाच्या मृत्यूने कुटुंबाला धक्का बसला आहे.

लिसाचा जन्म 1 फेब्रुवारी 1968 रोजी झाला. तिच्या पालकांच्या घटस्फोटानंतर, ती कॅलिफोर्नियामध्ये तिच्या आईसोबत राहत होती.

यादरम्यान ती तिच्या वडिलांनाही भेटत असे. 1977 मध्ये ती 9 वर्षांची असताना तिच्या वडीलांचा मृत्यू झाला.

ती तिच्या आजी-आजोबांसह तिच्या वडिलांच्या मालमत्तेची संयुक्त वारस बनली. तिच्या 25 व्या वाढदिवशी, लिसाला तिच्या आजी-आजोबांच्या निधनानंतर संपूर्ण संपत्ती मिळाली, जी 100 मिलियन डॉलर असल्याचं म्हटलं जातयं. 2004 मध्ये, लिसाने तिच्या वडिलांची 85 टक्के मालमत्ता विकली.

लिसाने तिच्या ५४ वर्षांच्या आयुष्यात चार लग्न केली. १९९४ मध्ये तिने संगीतकार डॅनी केफ याच्याशी लग्न केलंपण वीस दिवसातच घटस्फोट घेतला. त्यानंतर तिने जगप्रसिद्ध डान्सर मायकल जेक्सन सोबत लग्न केले आणि १९९६ मध्ये ते विभक्त झाले.

२००२ मध्ये तिने अॅक्टर निकोलस केज सोबत लग्न केले पण त्यांचा संसार फार काळ टिकू शकला नाही. त्यानंतर तिने ब्रिटिश संगीतकार लॉकवूड सोबत संसार थाटला आणि २०२१ मध्ये तेही विभक्त झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: देशभक्तांमध्ये सर्वजण येतात... आरोप करणारे देशद्रोही; उद्धव ठाकरेंचा जोरदार पलटवार!

RSS: आता ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही 'नकली आरएसएस' म्हणतील; नड्डांच्या फुलटॉसवर, ठाकरेंचा षट्कार

PM मोदींच्या द्वेषयुक्त भाषणाच्या आरोपावर काय कारवाई केली? न्यायालयाचा पोलिसांना सवाल! ५ जूनपर्यंत मागवला अहवाल

भाजपला RSS ची गरज आहे का? जेपी नड्डांनी एका वाक्यात संपवला विषय, BJP मध्ये अंतर्गत राजकारण पेटणार

Latest Marathi News Live Update : आप खासदार राघव चढ्ढा दिल्लीत दाखल

SCROLL FOR NEXT