मनोरंजन

लिट्ल चॅम्पस कार्तिकी गायकवाड अडकणार विवाह बंधणात, "या' महिन्यातील तारीख करणार निश्‍चित

संतोष भिंगार्डे



मुंबई ः आपल्या सुरांनी सगळ्यांना मंत्रमुग्ध करणारी सारेगमप लिटल चॅम्पस फेम कार्तिकी गायकवाड आता आपल्या आयुष्याची नवीन इनिंग खेळण्यास सज्ज झाली आहे. नुकताच बिझनेसमन असलेल्या रोनित पिसे याच्याशी तिचा साखरपुडा झाला आहे. तसेच यावर्षी डिसेंबर महिन्यात त्यांचे लग्नही होणार आहे. विशेष म्हणजे लाॅकडाऊमध्येच हे सगळं ठरलं आहे.

झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम सारेगमप लिटल चॅम्पस कार्तिकी सन २००९ मध्ये विजेती ठरली होती. संगीताचा वारसा कार्तिकीच्या घराण्यातच आहे. तिचे वडील कल्याणजी गायकवाड छोटे-मोठे कार्यक्रम करीत असताना पिसे कुटुंबीय कार्यक्रम पाहायला येत असत. पिसे कुटुंबीयांनादेखील संगीताची आवड होती. त्यामुळे कल्याणजी आणि पिसे कुटुंबीयांची  संगीताच्या कार्यक्रमातूनच ओळख वाढत गेली आणि लाॅकडाऊन असताना रोनित आणि कार्तिकीच्या लग्नाची बोलणी सुरू झाली. नुकताच कार्तिकी आणि रोनितचा साखरपुडा पुण्यातील धायरीतील एका रिसाॅर्टवर झाला. दोन्ही कुटुंबातील काही मोजकी मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होती.

रोनित कालिदास पिसे हा धायरी येथे राहतो आणि तो मेकॅनिकल इंजिनियर आहे. याबाबत माहिती देताना कार्तिकीचे वडील म्हणाले, की लाॅकडाऊनमध्येच हे सगळं ठरलं आहे. रोनितला संगीताची खूप आवड आहे. त्यामुळे सगळ्या बाबी लगेच जुळून आल्या आहेत. लग्नासाठी डिसेंबर महिन्यातील दोन तारखा आम्ही आता काढलेल्या आहेत. त्यातील एक तारीख निश्चित होईल.  

----------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha: निकाल येण्याआधी मानली हार? सुळेंनी ५० हजारांचं लीड घेताच सुनेत्रा पवारांच्या विजयाचे लावलेले बॅनर काढले

Lucknow Lok Sabha Result: भाजपच्या बालेकिल्ल्यात राजनाथ सिंहांची हॅट्रिकच्या पक्की, घेतली लाखांची आघाडी

Mumbai Lok Sabha election result 2024 : सभा घेतली, रोड शो केला.. तरीही मोदींचा करिष्मा चालला नाही; मुंबईतली गणितं कुठं चुकली?

India Lok Sabha Election Results Live : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना अमेठीमध्ये धक्का! इंडिया आघाडी किती घेतली लीट?

Maharashtra Lok Sabha Election Results Live : हातकणंगलेत सत्यजित पाटील सरूडकर आघाडीवर

SCROLL FOR NEXT