prathamesh laghate mugdha vaishampayan  Esakal
मनोरंजन

Prathamesh Laghate: “आमचं ठरलंय”नंतर प्रथमेश- मुग्धाच्या लग्नाची लगबग सुरु! केळवणाचा व्हिडिओ व्हायरल..

Vaishali Patil

Prathamesh laghateVideo: मराठीचा लोकप्रिय सिंगिंग शो ‘सारेगमप लिटील चॅम्प‘ हा टिव्ही विश्वातील लोकप्रिय शो खुप गाडला. या शो मधील प्रसिध्द गायक प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांच्या जोडीने काही दिवसांपुर्वीच चाहत्यांना गोड बातमी दिली. ही जोडी लवकरच लग्न करणार आहे. याची घोषणा त्यांनी काही दिवसांपूर्वी रोमँटिक फोटो शेअर करुन 'आमचं ठरलंय' असं म्हणत दिली.

त्यानंतर प्रथमेश-मुग्धाच्या चाहत्यांनी दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. आता चाहत्यांना त्यांच्या लग्नाची ओढ लागली आहे. आता प्रशमेशने त्याच्या चाहत्याना लग्नाबाबत आणखी एक अपडेट दिली. आता प्रथमेशच्या पहिल्यावहिल्या केळवणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

प्रथमेशने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेयर केलेला व्हिडिओत त्याचे केळवण खुपच छान आणि पारंपारिक पद्धतिने झाल्याचं दिसत आहे. या व्हिडिओत अनेक लोकही पारंपरिक वेशभूषेत होते. प्रथमेशला छान असं सरप्राईज दिलं.

या केळवणात प्रथमेशने पंच पक्वांनाचा आस्वाद घेतला. रत्नागिरीतील चतुरंग प्रतिष्ठानतर्फे प्रथमेशचं केळवण करण्यात आले होते. मात्र या केळवणात मुग्धा दिसली नाही. तिच्या चाहत्यांनी आणि प्रथमेशनेही तिला खुप मिस केलं. यावेळी प्रथमेशनं खास उखाणाही घेतला.

प्रथमेश लघाटेने हा व्हिडिओ शेयर करत कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘आमचं ठरलंयच्या घोषणेनंतर आता हळूहळू केळवाणांना सुरुवात होतीय! हे फीलिंग खूप भारी आहे! अतिशय पारंपरिक पद्धतीने, प्रचंड आपुलकीने, पंच पक्वांनाच्या जेवणाने, अतिशय आग्रहाने खाऊ घालून माझ्या केळवणांचा शुभारंभ “चतुरंग”ने केला त्याबद्दल चतुरंगच्या पूर्ण टीमला खूप खूप धन्यवाद!’.

15 जून रोजी दोघांनी पोस्ट शेयर करत त्यांच्या नात्याविषयी चाहत्यांना सांगितलं होतं. या व्हिडिओनंतर हे तर स्पष्ट झालयं की दोघांच्या घरी लग्नाच्या तयारीला वेग आला आहे. दोघांच्या लग्नाची तारिखही लवकरच चाहत्यांना कळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात तडीपार माजी आमदार भाजप उमेदवाराच्या प्रचारात; काँग्रेस नेत्यानं CCTV फूटेज दाखवत केले आरोप

ZP Election : झेडपी निवडणुकांचा लवकरच बिगुल वाजणार; १२ जिल्ह्यांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता

'80 व्या वर्षी रोमांस करण्याची इच्छा ही....' म्हातारपणातील इंटिमेसीबाबत नीना गुप्ता म्हणालेल्या...'पुरुष बाहेर जाऊन...'

Simple Home Remedies: रोज रात्री जेवणानंतर पोट फुगतंय? सतत गॅसचा त्रास होतोय? आजपासून करा 'हे' सोपे उपाय

Latest Maharashtra News Updates Live: हल्ल्यामागील खऱ्या सुत्रधारांना पोलिसांनी अटक करावी - ओवेसी

SCROLL FOR NEXT