Payal Rohatgi said her boyfriend Sangram Singh loves kids but she cannot get pregnant. Google
मनोरंजन

Lockupp: 'मी प्रेग्नेंट राहू शकत नाही,कारण..'; पायल रोहातगीचा मोठा खुलासा

पायलनं आपला बॉयफ्रेंड संग्रामचा उल्लेख करीत प्रेग्नेंट राहण्यात येणाऱ्या अडचणीविषयी धक्कादायक माहिती सांगितलीय.

प्रणाली मोरे

कंगना रनौतचा(Kangana Ranaut) 'लॉकअप'(LockUpp) शो आता फिनालेच्या दिशेने प्रवास करीत आहे. खरंतर जेव्हा हा शो लॉंच झाला तेव्हा गरिबांचा 'बिग बॉस' असं बोलून या शो ला डिवचलं गेलं होतं. पण शो मध्ये दर एपिसोडगणिक सहभागी झालेल्या कंटेस्टंट्समधील वाद,भांडणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खळबळजनक सीक्रेट्स यामुळे प्रेक्षकांच्या नकळत पसंतीस उतरला गेला. आता तर म्हटलं जातंय की जिंकण्यासाठी कंटेस्टंट सीक्रेट्स सांगताना शरमेचा पडदा उचलून फेकून देणार आहेत. नुकताच पायल रोहातगीनं तिच्या आयुष्यातील आणखी एक सीक्रेट्स समोर आणलं आहे. ज्यामुळे प्रेक्षक भावूक तर झालेच आहेत पण लग्नाआधीच मुल होण्यासाठी चक्क चार वेळा आयव्हीएफ ट्रीटमेंट घेतल्याचं तिनं सांगितल्यानं चक्रावले देखील आहेत. चला जाणून घेऊया नक्की काय म्हणालीय पायल रोहातगी.

पायल रोहातगी लॉकअप मधून बाहेर पडल्यावर तिचा बॉयफ्रेंड संग्राम सिंगसोबत लग्न करणार आहे. पण त्याआधी हे दोघे लीव्हइन मध्ये राहत आहेत. पायलनं लॉकअप च्या अनेक भागात आपल्या संग्राम सोबतच्या नात्याविषयी सांगितलं आहे. पण आता चक्क ती म्हणाली, संग्रामला लहान मुलं खूप आवडतात. पण मी आई बनू शकत नाही. आणि हे सांगताना ती चक्क ढसाढसा रडली. ती पुढे म्हणाली,''मला खूप वाटतं की मला मुलं व्हावीत. पण मी प्रेग्नेंट राहूच शकत नाही. मी आणि संग्राम गेल्या चार-पाच वर्षांपासून मुलांसाठी प्रयत्न करीत आहोत. चार-पाच वेळा IVF ट्रीटमेंटही केली,पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. लोकांनी मला,वांझ म्हणूनही संबोधलं. मला संग्रामसाठी खूप वाईट वाटतं. त्याला मुलं खूप आवडतात. मी अनेकदा त्याला म्हटलं,तु अशा एका मुलीशी लग्न कर जी तुला बाप होण्याचं सुख देईल''.

पायलनं लॉकअप मधील एका कॅमेऱ्यासमोर येऊन आपल्या मनातलं दुःख बोलून दाखवलं आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवताना पायलला धीरही देताना दिसत आहेत. अनेकजणांनी मुल दत्तक घेण्याचंही तिला सुचवलं आहे. संग्राम आणि पायल गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करीत आहेत. संग्रामनं शो मध्ये येऊन पायलला सर्वांसमोर प्रपोजही केलं होतं,तसंच शो संपल्यावर लवकरच पायल संग्रामसोबत लग्नबंधनात अडकणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Name Change Demand : आता थेट दिल्लीच्याही नावात बदल होणार? ; मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना 'या' व्यक्तीने पाठवलंय पत्र!

Balapur News : भिंत कोसळून आठ वर्षीय चिमुकला ठार; गावावर शोककळा

Women's World Cup 2025: भारताचा बांगलादेशविरुद्ध सामना पावसामुळे रद्द! साखळी फेरी संपली पाँइट्सटेबलमध्ये कोण कोणत्या स्थानी?

Tejashwi Yadav on Waqf Act : ‘’…तर आम्ही ‘वक्फ कायदा’ कचऱ्याच्या डब्यात टाकू’’ ; तेजस्वी यादव यांचं मोठं विधान!

Mohol Politics : अखेर ठरलं! सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील व माजी आमदार यशवंत माने यांचा बुधवारी हजारो कार्यकर्त्यासह भाजपात होणार प्रवेश

SCROLL FOR NEXT