london misal trailer gaurav more bharat jadhav rutuja bagwe ritika shrotri SAKAL
मनोरंजन

London Misal Trailer: भरत जाधव यांनी पहिल्यांदाच गायलं रॅप गाणं, 'लंडन मिसळ'चा चटपटीत धम्माल ट्रेलर भेटीला

गौरव मोरे - भरत जाधव यांच्या लंडन मिसळचा ट्रेलर भेटीला आलाय

Devendra Jadhav

London Misal Trailer: गौरव मोरे - भरत जाधव यांच्या लंडन मिसळ सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे. या सिनेमाचा ट्रेलर भेटीला आलंय. ए बी इंटरनॅशनल, म्हाळसा एंटरटेनमेंट आणि लंडन मिसळ लिमिटेड प्रस्तुत तसंच जालिंदर कुंभार दिग्दर्शित 'लंडन मिसळ' हा चित्रपट रिलीजसाठी सज्ज झालाय.

भारतात तसेच लंडनमध्ये शूट झालेल्या या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेते भरत जाधव अत्यंत हटके अशा प्रमुख भूमिकेत पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहेत.

(london misal trailer gaurav more bharat jadhav)

भरत जाधव यांनी पहिल्यांदाच गायलं रॅप गायन

आपल्या भूमिकेतून प्रेक्षकांना सरप्राईज देणाऱ्या भरत जाधव यांनी पहिल्यांदाच चित्रपटासाठी रॅप गायन देखील केलं आहे. श्री. रवींद्रनाथ टागोर यांच्या एका नाटकावरून 'लंडन मिसळ' हा चित्रपट प्रेरित आहे, हे या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य.लंडन मिसळ चित्रपटातल्या चटपटीत सीन्सनी आणि कलाकारांच्या धमाकेदार परफॉर्मन्सनी भरलेला ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे आणि सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

धमाकेदार गाणी आणि वेगळं कथानक

रितिका आणि ऋतुजाचे चित्रपटातील लूक्स कथेतील उत्सुकता वाढवतायत तर आपल्या अभिनयातून भरत जाधव पुन्हा एकदा विनोदाची चौफेर फलंदाजी करताना दिसतायत. गौरव मोरेनेही नेहमीप्रमाणे हास्याचे षटकार आपल्या सीन्समधून मारलेयत. त्यामुळे अर्थातच चित्रपटाच्या रिलीजची उत्सुकता वाढलीय. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज कलाकारांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी भाजपचे प्रदेशिय चिटणीस श्री.श्रीकांत भारतीय हे चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. वैशाली सामंंत, भरत जाधव, राधा खुडे, मुग्धा कऱ्हाडे, वैष्णवी श्रीराम यांच्या सुमधुर आवाजातील गाणी रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतील.

लंडन मिसळ या तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला

लंडन मिसळ सिनेमात ऋतुजा बागवे, रितिका श्रोत्री, माधुरी पवार, गौरव मोरे, निखील चव्हाण, ऋतुराज शिंदे आणि सुनील गोडबोले हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत तर भरत जाधव एका हटके भूमिकेत प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करताना दिसणार आहेत आणि ही प्रेक्षकांसाठी मोठी मेजवानी असेल. हा चित्रपट येत्या ८ डिसेंबरला प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vikas Lawande Bail : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांना जामीन; वारकरी संप्रदायाबद्दल केलेलं आक्षेपार्ह वक्तव्य, न्यायालयात नेमकं घडलं काय?

RCB vs GT Qualifier 1 : कागिसो रबाडाने इतिहास घडवला! मोहम्मद शमीचा विक्रम मोडला, शुभमन गिलच्या अफलातून झेलची हवा... Video

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात कर्मचारी संघटनेच्या 'या' मागण्या सरकार का स्वीकारत नाही? OPS बाबत महत्त्वाची माहिती...

School Notebook Price Hike : नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच पालकांना झटका! वह्या, पुस्तकांच्या किमतीत भरमसाठ वाढ; जून महिना उजाडण्यापूर्वीच बजेट कोलमडणार

सूर्यकुमार यादव IPL 2026 नंतर आता, युगांडा संघाविरुद्ध ट्वेंटी-२० सामना खेळणार! मुंबईत ही मॅच कधी व केव्हा होणार?

SCROLL FOR NEXT