lord bobby deol birthday celebration with paparazi and fans video viral  SAKAL
मनोरंजन

Bobby Deol Birthday: ५ थरांचा केक अन् भलामोठा हार, लॉर्ड बॉबीच्या वाढदिवसाचं दणक्यात सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ

लॉर्ड बॉबीच्या वाढदिवसाचं दणक्यात सेलिब्रेशन करण्यात आलंय

Devendra Jadhav

Bobby Deol Birthday Celebration News: बॉबी देओल हा सर्वांचा लाडका अभिनेता. बॉबीला आपण आजवर अनेक सिनेमा, वेबसिरीजमधून अभिनय करताना पाहिलंय. बॉबी देओलचा आज वाढदिवस.

२०२३ मध्ये अॅनिमल सिनेमाच्या माध्यमातून बॉबीने सर्वांचं लक्ष वेधलं. भूमिका छोटी असली तरीही बॉबीच्या अभिनयाचं खुप कौतुक झालं. अशातच बॉबीने आज पापाराझी आणि चाहत्यांसोबत वाढदिवसाचं खास सेलिब्रेशन केलं.

बॉबीच्या वाढदिवसाचं दणक्यात सेलिब्रेशन

बॉबीच्या वाढदिवस सेलिब्रेशनचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. या व्हिडीओत बॉबीच्या वाढदिवसाचं खास सेलिब्रेशन करण्यात आलंय. या व्हिडीओत बॉबी निळ्या रंगाचं टीशर्ट घालून बाहेर आला.

त्याच्याभोवती अनेक फॅन्सची गर्दी जमली होती. बॉबीसाठी ५ थरांचा केक ठेवण्यात आला होता. याशिवाय एका फॅनने बॉबीसाठी भलामोठा जाडजूड हार आणून त्याच्या गळ्यात टाकला. बॉबीने अॅनिमलमधील सिग्नेचर स्टेप करुन सर्वांचं मन जिंकलं.

वाढदिवशी बॉबीचं फॅन्सना गिफ्ट

अभिनेता सुरिया त्याचा पुढील तामिळ चित्रपट 'कंगुवा'साठी सज्ज झाला आहे. शनिवारी, 27 जानेवारी रोजी सोशल मीडियावर चित्रपटातील खलनायकी भूमिकेत असलेला अभिनेता बॉबी देओलचा लूक शेअर करण्यात आलाय. बॉबी सिनेमात उधीरन ही भूमिका साकरणार आहे,

बॉबीचा लूक शेअर करताच पोस्टमध्ये लिहिले आहे की, "निर्दयी. शक्तिशाली. अविस्मरणीय. आमचा #उधीरन, #लॉर्ड बॉबी सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा."

कंगुवाची उत्सुकता

'कंगुवा' चित्रपट 1500 वर्षांपूर्वीच्या काळात सेट केला गेला आहे. या सिनेमात संपूर्ण भारतातील भिन्न संस्कृती दर्शविणारे घटक दिसणार आहेत. शिवाय काल्पनिक कथांमध्ये प्राचीन तमिळ संस्कृतीशी संबंधित अनेक संदर्भ आणि तथ्ये पाहायला मिळणार आहेत.

हा चित्रपट 2024 च्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय कंगुवा 10 वेगवेगळ्या भाषांमध्ये 3D मध्ये प्रदर्शित होईल. या चित्रपटातून दिशा पटानी आणि बॉबी देओल साऊथ इंडस्ट्रीत पदार्पण करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT