Love aaj kal trailer released today kartik aryan sara ali khan imtiaz ali.jpg 
मनोरंजन

Love Aaj Kal : इम्तियाजच्या 'वीर'ला 'जोई' मिळणार का? ट्रेलर रिलीज

सकाळ डिजिटल टीम

'लव्ह आज कल' चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाल्यापासून त्याचा ट्रेलर कसा असेल याकडे सगळ्या इम्तियाजप्रेमींचं लक्ष लागलं होतं, आणि इम्तियाज अलीने पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांची अपेक्षा पूर्ण केली आहे. 'लव्ह आज कल'चा ट्रेलर म्हणजे कार्तिक आर्यन, सारा अली खान आणि इम्तियाज अली यांनी केलेली जादू आहे.

आताच्या परिस्थितीतली लव्हस्टोरी आणि जुन्या काळातली लव्ह स्टोरी यांचा मेळ याही चित्रपटात इम्तियाज अलीने घातला आहे. वीरचं झोईवर असलेलं आपार प्रेम, सारखा तो तिच्या मागे असणं, तिला सगळ्याच परिस्थितीत सांभाळू पाहणारा वीर एका वळणावर झोईला त्रासदायक वाटू लागतो. मात्र तो दूर गेल्यानंतर झोईला कळलेली त्याची किंमत आणि पुन्हा एकत्र आलेले झोई वीर यांची प्रेमकहाणी या चित्रपटात बघायला मिळेल. कार्तिक, सारा, आरूषी शर्मा, रणदीप हुडा हे या ट्रेलरमध्ये दमदार अभिनय करताना दिसतात. ट्रेलमधली गाणी ऐकून याआधीच्या 'लव्ह आज कल'ची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. 

दिग्दर्शक इम्तियाज अलीचा 'लव्ह आज कल' 14 फेब्रुवारीला म्हणजेच 'व्हॅलेंटाईन डे'ला आपल्या भेटीला येतोय. काल या चित्रपटाचं पोस्टर लॉन्च झालं. सारा अली खान आणि कार्तिक आर्यन या चित्रपटात मुख्य भूमिकेत असतील. 2009मध्ये आलेला सैफ अली खान आणि दीपिका पदुकोनचा पहिला 'लव्ह आज कल' आजही प्रेक्षकांचा आवडता आहे. त्यात इम्तियाज अली पुन्हा एकदा एक रेट्रो आणि सद्यस्थितीवर भाष्य करणारी लव्हस्टोरी घेऊन येत असल्याने त्याचे चाहते खूश आहेत. 

असं आहे 'लव्ह आज कल'चं पोस्टर...
अभिनेता कार्तिक आर्यन याने हे पोस्टर शेअर केलंय. या पोस्टरमध्ये कार्तिक आणि सारा दिसताहेत. कार्तिक झोपलाय आणि त्याच्या पाठीवर सारा पहुडली आहे, असं हे पोस्टर आहे. पोस्टरवर 'LOVE AAJ KAL' असं लिहिलंय आणि दोन्ही बाजूला #2020 आणि #1990 अशी वर्षं लिहिली आहेत. या पोस्टरला कार्तिकने 'वहाँ हैं नहीं जहाँ लेटे हैं... कहीं उड़ रहे हैं Veer और Zoe' असं कॅप्शन दिलंय.

पोस्टरवरून तरी इम्तियाज स्टाईल लव्हस्टोरी पुन्हा बघायला मिळणार हे निश्चित!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyclone Montha: चक्रीवादळ 'मोंथा'मुळे देशभरातील हवामान बदलणार ; पुढील पाच दिवसांत 'या' राज्यांना पावसाचा इशारा!

मोठी बातमी! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; उमेदवारांना करता येईल २९ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत ‘या’ वेबसाईटवर अर्ज; एका पदासाठी एकाच अर्जाची अट

Montha Cyclone update : 'मोंथा' चक्रीवादळाचं थैमान सुरू! आंध्र प्रदेशात किनारपट्टी भागाला जोरदार तडाखा

Fake Acid Attack Case : धक्कादायक! दिल्लीत विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ल्याचं प्रकरण बनावट असल्याचे निष्पन्न!

दिवाळीपूर्वी मदत देण्याची घोषणा, तरी..! निम्मा सोलापूर जिल्हा अतिवृष्टीच्या मदतीपासून दूर; 3.95 लाख शेतकऱ्यांना मिळाली नाही भरपाई, तालुकानिहाय संख्या...

SCROLL FOR NEXT